ने. हि. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, ब्रम्हपुरीचे सुयश
श्रुती मोरेश्वर कोसरे 83.67 % गुणांसह प्रथम
ब्रम्हपुरी:-
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,पुणे मार्फत घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा (12 वी) निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या निकालात नागपूर विभागामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे विद्यालय म्हणून आपली विशेष ओळख निर्माण करणाऱ्या ने. भै. हि. शिक्षण संस्था, ब्रम्हपुरी द्वारा संचालित नेवजाबाई हितकारिणी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, ब्रम्हपुरीचा निकाल 90 % लागला असून विद्यालयाने उत्कृष्ट निकाल देण्याची परंपरा कायम ठेवली आहे.
विद्यालयातून कु. श्रुती मोरेश्वर कोसरे 83.67 % गुण प्राप्त करित प्रथम आली आहे. श्रेयश टोमदेव काळबांधे 76.67 % गुणांसह द्वितीय, कु. स्विटी मोरेश्वर सिंदीमेश्राम 75.83 % गुण मिळवित तृतीय आली आहे. विद्यालयातून कु. सानिया नरेश भुरसे 75.67 % गुणांसह चौथी, तर 75.33 % गुणांसह कु. नंदनी राजू समर्थ पाचवी आली आहे.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती स्नेहलताबाई भैया, सचिव अशोकजी भैया, सहसचिव ॲड. भास्करराव उराडे,सदस्य प्रा. सुभाषजी बजाज, सदस्य गौरवजी भैया व संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य के. एम नाईक, उपप्राचार्य ए. डब्ल्यू. नाकाडे, पर्यवेक्षक प्रा. पी. आर. जीभकाटे, डॉ. पी. एन. बेंदेवार, प्रा. कु. एन. डब्ल्यू. खाडीलकर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद व प्रशासकीय कर्मचारीवृंद यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.