प्रमोद चिमूरकर यांच्या वाढदिवसानिमित्य स्पर्धा परिक्षा व गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न

   


ब्रम्हपुरी/का.प्र.
  चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि ब्रम्हपुरी अखिल कुणबी समाज मंडळाचे उपाध्यक्ष प्रमोद चिमुरकर यांनी समाजहितासाठी विधायक उपक्रम राबवून एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे.
 प्रमोद चिमुरकर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रमोदभाऊ चिमुरकर मित्र परिवार व आर.डब्ल्यु. अकॅडमी, ब्रम्हपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने राजीव गांधी सभागृह, ब्रम्हपुरी येथे स्पर्धा परीक्षा व गुणवंतांचा सत्कार सोहळा पार पडला. या उपक्रमात विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, त्यांचा सन्मान व्हावा आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी दिशा मिळावी, हा उद्देश ठेवण्यात आला. या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून सेवानिवृत्त प्राचार्य भाऊराव राऊत, गिरीश बुराडे, योगेश मिसार, उमेश धोटे (सरपंच चौगान), वकार खान, वासुदेव सोंदरकर, अमित कन्नाके, सुहास कटकमवार, सुरज मेश्राम, सुरज तलमले, पत्रकार संतोष पिलारे, होमराज लोनबले, दीपक मेहर, विलास दुपारे, सुधीर शिवरकर, मनोहर सहारे, सुरज शिवनर, चुनी नागमोती यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
 याप्रसंगी स्पर्धा परीक्षेत प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मोहित गावतुरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला, गणराज दोणाडकर द्वितीय तर शालिंद्र ढोक यांनी तृतीय क्रमांक पटकावला. त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.
   कार्यक्रमाचे संचालन सुरज मेश्राम यांनी तर आभारप्रदर्शन होमराज लोनबले यांनी केले. याप्रसंगी परिसरातील विद्यार्थी, पालक, मित्रपरिवार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  Post Views:   60



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी