ब्रह्मपुरीतील नामांकित स्पा सेंटर मध्ये देहविक्रीचा व्यवसाय
स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरच्या पथकाची कारवाई
ब्रह्मपुरी / महेश पिलारे
ब्रह्मपुरी शहरातील एका नामांकित स्पा सेंटर मध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याच्या संशयावरून स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरच्या पथकाने आज दि. २२ नोव्हेंबर २०२५ ला सायंकाळच्या सुमारास कारवाई केल्याची प्राथमिक माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार, ब्रह्मपुरी शहरातील प्रमुख चौकात असलेल्या एका नामांकित स्पा सेंटर मध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरच्या पथकाने कारवाई केल्याची माहिती मिळाली आहे. यात तीन महिलांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असल्याची प्राथमिक माहिती आहे. रात्रो उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. वृत्त लिहेस्तोव गुन्हा दाखल झाला नव्हता.
(सविस्तर वृत्त वाचण्यासाठी ब्रम्हपुरी समाचार वेब पेज ला भेट द्या)