नोकरीचे आमिष देऊन ५.५ लाखांनी आर्थिक फसवणूक
ब्रम्हपुरी/का.प्र.
नागपूर येथे तुमच्या मुलीला सरकारी नोकरी लावून देतो म्हणून, सेवानिवृत्त कर्ल्कची दोघांनी आर्थिक फसवणूक केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. आर्थिक फसवणूक करणार्या् त्या दोघांविरूद्ध ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी यशवंत शेंडे हे अड्याळ जाणी येथील रहिवासी आहेत. त्यांची मुलगी सन २०२१ मध्ये तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक म्हणून खासगी शाळेत नोकरी करीत होती. तिथे आरोपी विनोद मेश्राम राह. भूज याची बहिन नोकरी करीत असल्यामुळे त्यांचा परिचय होता. आरोपी विनोद मेश्राम याने फिर्यादीने त्यांच्या मुलीला कनिष्ठ लेखापाल एअरलाईन अॅ थॉरीटी ऑफ इंडिया येथे नोकरी लावून देतो म्हणून आरोपी मनोज दादाजी मरसाळे रा. नवेगाव यांच्याशी ओळख करून दिली. आरोपी मनोज मरसाळे हे पायलट म्हणून काम करीत असून त्यांच्या ओळखीने तुमच्या मुलीला सहाय्यक व्यवस्थापक म्हणून नोकरी लावण्यासाठी १० लक्ष रूपयांची मागणी केली. मुलीच्या नावाने ऑफर लेटर आणून सहाय्यक व्यवस्थापक म्हणून नौकरी लागल्याचे भासविले. मुलीच्या नावाने ऑफर लेटर आणून सहाय्यक व्यवस्थापक म्हणून नौकरी लागल्याचे भासविले. फिर्यादीने चेक द्वारे आरोपींच्या खात्यात रक्कम वळती केली. विमानतळाजवळील द ट्रावोटेल सुट्स नावाच्या हॉटेलमध्ये फिर्यादीच्या मुलीला जॉईनींग प्रक्रियेसाठी बोलवून कसल्याही प्रकारची नियुक्ती न करता परत पाठविले. फिर्यादीने मुलीच्या नोकरीबाबत आरोपींना विचारणा केली असता, त्यांनी उडवा उडवीचे उत्तरे दिली. नोकरी मिळत नसल्या कारणामुळे फिर्यादी शेंडे आरोपींना वेळोवेळी पैसे परत मागीतले असता, ऑनलाईन स्वरूपात ४.५ लक्ष रूपये दि.०४ फरवरी २०२४ पर्यंत परत केले. परंतु उर्वरीत ५.५लक्ष रूपये देण्यासाठी आरोपी विनोद मेश्राम व आरोपी मनोज मरसाळे टाळाटाळ करीत असल्यामुळे फिर्यादी शेंडे यांनी ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात दोघांविरूद्ध तक्रार दाखल केली.
आरोपी विनोद मेश्राम व आरोपी मनोज मरसाळे यांच्या विरूद्ध ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.