ने.हि. महाविद्यालयात जागतिक जलदिन साजरा

   


ब्रह्मपुरी/का.प्र.
येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय, ब्रम्हपुरी येथे भूगोल पदवी व पदव्युत्तर विभागामध्ये नुकताच ‘जागतिक जलदिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून डॉ.आर. के. डांगे, भूगोल विभागप्रमुख यांनी, ‘जल संवर्धन एक काळाची गरज' यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी उपप्राचार्य डॉ.एस.एम.शेकोकर, शारीरीक शिक्षण विभागप्रमुख यांनी "पाण्याची उपलब्धता व जलाचे महत्व" यावर विद्यार्थ्यांना यथोचित मार्गदर्शन केले. डॉ.किशोर नाकतोडे यांनी जागतिक जल दिनाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. डॉ. आशिष साखरकरांनी, जल हे जीवन आहे या विषयावर भाष्य केले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.डी.एच. गहाणेंनी आपल्या अध्यक्षीय भाषणात "जागतिक जल दिनाची आवश्यकता का?" यावर विद्यार्थ्याशी संवाद साधला. 
"जागतिक जलदिन" या कार्याक्रमाचे संचालन डॉ. योगीता कारनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. श्रीकान्त पिसे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भूगोल विभागाच्या विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. आर.के. डांगे, डॉ. आशिष साखरकर, डॉ. प्रतिभा कढव, डॉ. योगीता कार, एम. आर. हटवार तसेच पदवी व पदव्युत्तर विभागाचे सर्व विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

  Post Views:   34



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी