घरगुती गृहउद्योग करून आर्थिक सक्षम व्हा - प्रा. प्रकाश बगमारे

   

ब्रह्मपुरी/का.प्र.
वर्तमान काळातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना शिक्षणामुळे नोकरी मिळेलच अशी आशा ठेवावी. पण त्याच बरोबर जर नोकरी मिळाली नाही तर पारंपारिक गृह उद्योग आणि व्यवसायात सहकार्य करून आपले पुढील आयुष्य सुखकर करण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन श्री. श्रावणजी बगमारे शिक्षण संस्था ब्रम्हपुरी द्वारा संचालित डॉ. पंजाबराव देशमुख जुनिअर कॉलेज ब्रम्हपुरी येथे व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रमानिमित्त संस्थेचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा प्रकाशजी बगमारे यांनी केले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना यथोचित मार्गदर्शन करण्यासाठी सेवानिवृत्त प्रा. दिलीप जुमडे हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी स्वतःच्या अनुभवातून शून्यातून कसे आपले कार्य पुढे नेता येईल याचा लेखाजोखा विद्यार्थिनींच्या समोर मांडला. अलीकडच्या काळात अनेक गृह उद्योग घरच्या घरी करण्याचे आहेत. वस्तू तयार करून त्याचे योग्य मार्वेâटिंग केलं तर आपली आर्थिक गरज निश्चितपणे भागविता येऊ शकते आणि आपल्या पायावर उभे होता येते. नोकरीच्या मागे लागून राहणे योग्य आहे पण काही कालावधीनंतर जर नोकरी मिळाली नाही तर जीवनचरितार्थ चालविण्यासाठी छोट्या-मोठ्या गृह उद्योगाची उभारणी करणे अत्यंत आवश्यक आहे. याची सुरुवात शालेय काळापासूनच आपण करावी असे अनेक उदाहरणाद्वारे प्रा. दिलीप जुमडे यांनी विशद केले. 
या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्राचार्या शारदाताई ठाकरे, प्रा. सुभाषचंद्र खोब्रागडे, प्रा. हेमलता बगमारे, गोवर्धन दोनाडकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. सुभाषचंद्र खोब्रागडे यांनी तर उपस्थित मान्यवर व विद्यार्थिनी यांचे आभार गोवर्धन दोनाडकर यांनी मानले. प्रसंगी प्रत्येक आठवड्यात एक दिवस शाळाबाह्य उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना सक्षम बनविण्याचा उपक्रम डॉ. पंजाबराव देशमुख गर्ल्स ज्युनिअर कॉलेजने अविरत चालवावा, अशी सूचना संस्था अध्यक्ष प्रा. प्रकाशजी बगमारे यांनी केली.

  Post Views:   5



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी