घरफोडी करणारे आरोपी जेरबंद
ब्रह्मपुरी डि.बी पथकाची कामगिरी
ब्रह्मपुरी
फिर्यादी गोवर्धन नीलकंठ गायधने वय 41 हे मराठा लेआउट कूर्झा,ब्रह्मपुरी येथील रहिवासी आहेत. फिर्यादी गोवर्धन गायधने हे दिनांक 17 जून 2025 रोजी कामानिमित्त बाहेरगावी गेले असताना, रात्रीच्या वेळेस कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फिर्यादी गायधने याच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून,आत प्रवेश केला. बेडरूम मध्ये लॉकर मध्ये ठेवलेले पैसे, सोन्याचे दागिने, असा एकूण 50,000 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात व्यक्तीने चोरून नेला.
फिर्यादी गायधने यांनी झालेल्या घटनेची ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल झाल्यानंतर ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनचे डि.बी. पथकामार्फत अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना, पोलीस स्टेशन रेकॉर्डवरील आरोपीच सदर गुन्ह्यात सहभाग असल्याबाबत खात्रीशीर गोपनीय माहिती ब्रह्मपुरी पोलिसांना मिळाली. माहिती मिळाल्याने ब्रह्मपुरी पोलिसांनी आपली तपस चक्रे वेगाने फिरवून, आरोपी अनिल रामभाऊ दांडेकर वय 30 राहणार हत्तीगोटा, ब्रह्मपुरी व विकी ज्ञानेश्वर जांगडे वय 30 राहणार नान्होरी ता. ब्रह्मपुरी यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी, सदर घरफोडी केल्याची कबुली त्यांनी कबुली दिली. गुन्हा कबूल केल्यानंतर पोलिसांनी सदर आरोपीना अटक करून आरोपीकडून 7500 रुपये रोख, चोरी केलेल्या रकमेमधून विकत घेतलेला 5500 रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल, 5000 रुपये किमतीची एक ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी व 15000 रुपये किंमतीची 3 ग्रॅम वजनाची नाकातील नथ असा एकूण 33,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही आरोपीस प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता, त्यांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. पोलिसांनी दोन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, सा. अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे, पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या मार्गदर्शनात सहा. पो नि मनोज खडसे, पोहवा योगेश शिवणकर, पो हवा अजय कटाईत , पोना मुकेश गजबे,पोशी स्वप्निल पळसपगार, चंदू कुरसंगे, इरशाद खान,निलेश तुमसरे यांनी केलेली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक मुकेश गजबे हे करीत आहे.