गणेश अॅ ग्रिकल्चरल एजन्सीच्या पाणपोईचे लोकार्पण
ब्रम्हपुरी/का.प्र.
हनुमान जयंतीच्या शुभपर्वावर दिनांक १२ एप्रिलला ब्रम्हपुरी येथील भगतसिंग चौकातील पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले.
गणेश अॅजग्रिकल्चरल एजन्सीचे मालक व समाजसेवक तथा समाजगौरव पुरस्कारप्राप्त प्रतिष्ठित व्यापारी पंढरीनाथ खानोरकर यांनी रेल्वेने प्रवास करणार्यान प्रवाशांची व वाटसरूंची तहान भागविण्यासाठी येथील भगतसिंग चौकात असलेल्या आपल्या प्रतिष्ठानाचे लगत मागील २२ वर्षापासून पाणपोई सुरु करून सामाजिक बांधीलकी जोपासली आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, सुर्याचा पारा चांगला वर चढत आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासी व सामान्य नागरीकांना थंड पाण्याची गरज पडते. त्यांना योग्य वेळी व योग्य ठिकाणी थंड पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, या उदात्त हेतुने व दर वर्षीच्या उन्हाळ्याचा अनुभव लक्षात घेता माठातील व रांजनातील पाणी उष्णतेमुळे थंड होत नसल्याने मागील ५ वर्षापासून थंड पाण्याकरीता वाटर कुलरची व्यवस्था करण्यात आली आहे.
पाणपोईचे लोकार्पण दिपकजी उराडे यांचे उपस्थितीत चंदनराव समर्थ यांचे शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी पंढरीनाथ खानोरकर, कुंदाताई खानोरकर, अनिरुद्ध राऊत, भास्कर सहारे, गोलू साखरकर, कवि कामथे, प्रविण मेश्राम, महेश दिघोरे, पराग मैंद, प्रविण शेंडे तसेच बालगोपाल मंडळी उपस्थित होते.