नेवजाबाई हितकारिणी विद्यालय ब्रह्मपुरीचे जयंत पराते यांचा नवोपक्रम राज्यस्तरासाठी पात्र

   

ब्रह्मपुरी :
       राज्यातील नवोपक्रमशील शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. अध्यापन अधिक प्रभावी, रंजक व परिणामकारक व्हावे, तसेच विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्या शैक्षणिक समस्या सोडविण्याच्या उद्देशाने विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात.
             राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), पुणे, महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेच्या जिल्हास्तरीय द्वितीय फेरीतून नेवजाबाई हितकारिणी विद्यालय, ब्रह्मपुरी येथील शिक्षक श्री. जयंत पराते यांची राज्यस्तरासाठी निवड करण्यात आली आहे.
             राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेमध्ये श्री. जयंत पराते यांनी “क्वेश्चन ऑफ द डे” या विषयावर अत्यंत प्रभावी व कौशल्यपूर्ण सादरीकरण केले. त्यांच्या या नवोपक्रमाची राज्यस्तरावरील प्रथम पाच उत्कृष्ट नवोपक्रमांमध्ये निवड झाल्याने विद्यालयासह संपूर्ण तालुक्याला गौरव प्राप्त झाला आहे.
         या उल्लेखनीय यशामुळे नेवजाबाई हितकारिणी विद्यालयाचे नाव जिल्हा पटलावर पुन्हा एकदा उज्वलपणे कोरले गेले आहे. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव श्री. अशोकजी भैया, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. नाईक सर, उपमुख्याध्यापक श्री. नाकाडे सर, पर्यवेक्षक श्री. जीभकाटे सर तसेच समस्त शिक्षकवृंद यांनी श्री. जयंत पराते यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

  Post Views:   133




संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी