ब्रम्हपुरी बस आगाराला मिळाल्या ५ नवीन बसेस
प्रवाशी व आगार कर्मचार्यांलमध्ये आनंद
ब्रम्हपुरी/का.प्र.
चंद्रपूर जिल्ह्यातील आणि गडचिरोली विभागांतर्गत ब्रम्हपुरी आगार व्यवसायाच्या दृष्टीने अव्वल क्रमांकावर असून महत्वाचे ठिकाण आहे. ब्रम्हपुरी आगारातून लांब टप्प्याच्या गाड्या सोडण्यात येतात. मात्र या आगाराला गाड्यांची कमतरता असल्यामुळे प्रवाशांची तसेच ब्रम्हपुरी आगारातील कर्मचार्यांाना गैरसोय व इतर समस्यांना सामोरे जावे लागत होते. वेळेवर गाड्या उपलब्ध होत नसल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत होते. ही अडचण लक्षात घेता ब्रम्हपुरी येथील सामाजिक कार्यकर्ता तथा पत्रकार प्रशांत डांगे यांनी मागील दोन वर्षापासून संबंधित विभाग, मंत्री यांचेकडे ब्रम्हपुरी आगाराला नवीन बसेस मिळावे यासाठी पत्रव्यवहार केले होते.
नुकतेच नाम. प्रतापजी सरनाईक परिवहन मंत्री तसेच व्यवस्थापकीय संचालक परिवहन विभाग मुंबई यांना ब्रम्हपुरी आगाराला नवीन बसेस मिळण्याची पत्राद्वारे मागणी केली होती. सोबतच खासदार नामदेव किरसान, विद्यमान आमदार तथा माजी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी शिफारस पत्र देऊन मागणी करावी तसेच माजी आमदार अतुलभाऊ देशकर यांना सुद्धा आपण पत्रव्यवहार करावा अशी विनंती केली होती.
त्यानुसार दि. १६ एप्रिलला पहिल्या टप्प्यात ब्रम्हपुरी आगाराला नवीन पाच बसेस मिळालेल्या आहेत तर उर्वरित पाच बसेस दुसर्याह टप्प्यात मिळणार आहेत.