एच.एस.सी.परिक्षेत ने.हि. महाविद्यालयाची सिद्धी पटेल तालुक्यातून प्रथम
ब्रम्हपुरी तालुक्याचा निकाल ९१.२८ टक्के
ब्रम्हपुरी/का.प्र.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी परिक्षेचा निकाल राज्यमंडळाने सोमवारला दुपारी ०१ वाजता ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावर जाहीर केला. यात पूर्व विदर्भात शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणार्या ब्रम्हपुरी शहरातील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयाची वाणिज्य विभागाची विद्यार्थीनी सिद्धी अशोक पटेल हिने ९७.१७ टक्के गुण संपादित करीत तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच स्मिता लोमेश तोंडरे ह्या विद्यार्थीनीने ९२.६७ टक्के हीने द्वितीय तर ओम प्रशांत बल्लेवार याने ९०.१७ टक्के गुण प्राप्त करून तृतीय स्थान मिळविले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाची अनुष्का विनोद मेश्राम हिने ८८.६७ टक्के गुण प्राप्त करीत विज्ञान शाखेतून तालुक्यातून प्रथम येण्याचा मान पटकाविला. तर लोकमान्य टिळक महाविद्यालयाची विद्यार्थीनी रूतूजा जीवनदास भरडे हिने ८५.५० टक्के गुण संपादित करून कला शाखेतून तालुक्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केला. विद्यार्थ्यांच्या सर्वोत्तम गुण प्राप्तीमुळे नेवजाबाई भैय्या हितकारिणी शिक्षण संस्थेचे सचिव अशोक भैय्या यांनी अभिनंदन केले.
२२३२ विद्यार्थ्यांपैकी २२३२ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी २०३२ विद्यार्थी इयत्ता १२ वी ची परीक्षा उत्तीर्ण झाले असून यात प्राविण्य श्रेणीमध्ये ५७ विद्यार्थी, प्रथम श्रेणीमध्ये ३०४ तर द्वितीय श्रेणीमध्ये १०५२ व पास श्रेणीमध्ये ६१९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ब्रम्हपुरी तालुक्याचा इयत्ता १२ वी चा निकाल ९१.२८ टक्के इतका लागला आहे. ब्रम्हपुरी तालुक्यातून ख्रिस्तानंद ज्यु. कॉलेजचा निकाल १०० टक्के लागला आहे.