बीएसएनएल सल्लागार समितीवर दिपक ठाकरे
ब्रम्हपुरी/का.प्र.
चंद्रपुर जिल्हा बीएसएनएल दूरसंचार निगम लिमिटेडच्या सल्लागार समितीवर बोडधा येथील दिपक ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड गडचिरोली-चिमुर लोकसभेचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या शिफारशीवरून केंद्रीय दूरसंचार व उत्तर पुर्व क्षेत्र विकास मंत्री ज्योदीरादित्य सिंधिया यांनी केली आहे.
दिपक ठाकरे हे बोडधा ग्रामपंचायतचे उपसरपंच असुन जिल्ह्यातील दूरसंचार सेवा आता अधिक कार्यक्षम होण्यास मदत होईल. त्यांनी आपल्या निवडीचे श्रेय खासदार डॉ.नामदेव किरसान, आमदार विजय वडेट्टीवार, गडचिरोली कांग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांना दिले आहे. ग्रामीण भागात राहुन राजकिय क्षेत्रात कार्य करीत सामाजिक कार्य करणार्या दिपक ठाकरे यांचे बोडधा येथील गावकर्यांनी त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.