ब्रम्हपूरी येथील स्पा सेंटरवर पोलिसांची धाड; तीन महीलांची सुटका
ब्रह्मपुरी
ब्रम्हपुरी शहरातील नागभीड रस्त्यावरील गीत पेट्रोल पंपच्या मागे असलेल्या माय हेल्थ प्रो स्पा अॅण्ड वेलनेस सेंटर येथे सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर पोलीसांनी मोठी कारवाई केली आहे. दिनांक 22 नोव्हेंबर रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, या ठिकाणी अनैतिक व्यापार सुरू असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी विशेष पोलिस अधिकारी, महिला पंच, समाजसेविका आणि बनावट ग्राहक यांच्या उपस्थितीत धाड टाकून कारवाई केली आहे.
या कारवाईत मिझोरम व नागालँड राज्यातील तीन पिडीत महिलांची सुटका करण्यात आली. त्याचबरोबर स्पा सेंटरचा मॅनेजर करण गंगाधर मोहजनकर (वय 24, रा. पांजरेपार, ता. नागभीड) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर स्पा मालक प्रितीश बुरले रा. भवानी वार्ड ब्रम्हपुरी हा आरोपी मात्र सध्या फरार असून त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
धाडीत रोख रक्कम, मोबाईल, रजिस्टर, पावती बुक, स्कॅनर, निरोध पाकिटे असा एकूण 18 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी येथे अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 अंतर्गत कलम 3, 4, 5 व 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत अमोल काचोरे, पोलीस निरीक्षक (स्थानिक गुन्हे शाखा), प्रमोद बानबले पोलीस निरीक्षक ब्रम्हपुरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक शितल खोब्रागडे, पोउपनि संतोष निंभोरकर, सर्वेश बेलसरे, नितेश महात्मे, छाया निकोडे, निराशा तितरे, अपर्णा मानकर, प्रफुल्ल गारघाटे, प्रदीप मडावी, अजित शेन्डे, सुमित बरडे,दिनेश आराडे तसेच इतर पोलीस कर्मचारी आणि समाजसेविका सरिता मालु, माया मेश्राम, हर्षा वानोडे यांनी सहभाग घेतला.
स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर आणि पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी यांची ही संयुक्त कारवाई असून पुढील तपास सुरू असून यातील स्पा सेंटरचा मॅनेजर करण गंगाधर मोहजनकर (वय 24, रा. पांजरेपार, ता. नागभीड) यास ब्रह्मपुरी येथील न्यायालयात हजर केले असता, त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.