पक्ष्यांसाठी जलपात्र तयार करून त्याचे वाटप

   

ब्रम्हपुरी/का.प्र.
 ब्रम्हपुरी येथील उष्णतामान जगात उच्यांकावर आहे. उन्हाळ्यात पक्ष्यांना तहान भागविण्यासाठी सहजपणे पाणी उपलब्ध व्हावे, नागरिकांमध्ये विशेषतः लहान मुलामंध्ये पक्षी संवर्धन आणि संरक्षणाची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. ३ ब्रम्हपुरी येथील पाच विद्यार्थ्यांना मनोहर वरवाडे यांनी जलपात्राचे वाटप केले. यावेळेस मुख्याध्यापिका के. एन. खोब्रागडे, शिक्षिका प्रियंका मेश्राम, तुळशीदास तलमले, कैलास मेश्राम आणि विद्यार्थी उपस्थित होते.
 तसेच गोसिखुर्द उजवा कालवा उपविभाग क्र. ५ ब्रम्हपुरी येथील खेड वसाहतीमध्ये चार ठिकाणी झाडांना जलपात्र बांधले. जलपात्रात पाणी टाकण्याची जबाबदारी वसाहतीतील कर्मचारी कैलास मेश्राम यांनी स्वीकारली असून मनोहर वरवाडे यांच्या कार्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

  Post Views:   38



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी