ब्रम्हपुरीत जिजाऊ रथयात्रेचे भव्य स्वागत

   


ब्रम्हपुरी/का.प्र.
समाजातीलसमता, बंधुता आणि न्यायाच्या आदर्शांची भावना दृढ करणारी जिजाऊ रथयात्रा महाराष्ट्रभर धाव घेत आहे. या रथयात्रेचा ब्रम्हपुरीत शनिवार, १२ एप्रिल रोजी उत्साहात आणि श्रद्धेने स्वागत करण्यात आले. यात्रेच्या रथात राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेचे दर्शन घेण्यासाठी नागरिक, सामाजिक संस्था आणि विविध गट एकत्र आले.
ढोल-ताशांच्या गजरात रथयात्रेचा ब्रम्हपुरी शहरात स्वागत करण्यात आले. या रथयात्रेचे आयोजन मराठा सेवा संघाने केले आहे. ही यात्रा १८ मार्च २०२५ रोजी वेरूळ (शहाजी राजे भोसले यांचे जन्मस्थळ) येथून सुरु झाली असून, ०१ मे २०२५ रोजी पुण्यातील ऐतिहासिक लालमहालात तिचा समारोप होणार आहे. या यात्रेचा मुख्य उद्देश समाजातील एकता, स्त्रीशक्तीचा गौरव आणि राजमाता जिजाऊंच्या कार्याचे स्मरण करणे हा आहे. ही यात्रा समाजमनात एकतेची व समतेची मशाल पेटवत आहे. खाजगीकरण, बेरोजगारी, शेतकर्यांचच्या आत्महत्या, भ्रष्टाचार, महागाई अशा असंख्य प्रश्नांनी ग्रासलेल्या जनतेला धर्मांधतेच्या चक्रात अडकवण्याचा सत्ताधार्यांोचा डाव जिजाऊ रथयात्रा उघड करत आहे.
ब्रम्हपुरी तालुक्यात प्रवेश केल्यानंतर निलज, रुई, किन्ही आणि पारडगाव येथील गावकर्यां नी पारंपरिक भजन दिंडीसह यात्रेचे स्वागत केले. ब्रम्हपुरी शहरातील मुख्य रस्त्यावर मिरवणूक काढली गेली आणि या वेळी प्रियदर्शिनी इंदिरा गांधी, संत गाडगेबाबा, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी तसेच जगतगुरू तुकाराम महाराज यांच्या स्मारकांना भेट देऊन माल्यार्पण करण्यात आले.
रथयात्रेच्या भव्य स्वागतासाठी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, शिवछत्रपती फाउंडेशन आणि इतर सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. ब्रम्हपुरीतील दानशूर व्यक्तींनी देखील यशस्वी आयोजनासाठी मोलाचे सहकार्य दिले.

  Post Views:   41



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी