एलएमबी स्कुलच्या विद्यार्थ्यांचे एकलव्य ज्ञानवर्धिनी सामान्यज्ञान स्पर्धा परिक्षेत प्राविण्य
ब्रम्हपुरी/का.प्र.
एल.एम.बी. पब्लिक स्कुलमध्ये प्रत्येकवर्षी एकलव्य ज्ञानवर्धिनी सामान्य ज्ञान स्पर्धा नागपुर व्दारा परीक्षेचे आयोजन केले जाते. या वर्षी पण ही परीक्षा घेण्यात आली. या परिक्षेचा एकच उद्देश आहे तो म्हणजे ‘शिका आणि मोठे व्हा'. परिक्षेचे स्वरूप असे असते की प्रश्नपत्रिके सोबत उत्तर पत्रिका विद्यार्थ्यांना दिली जाते. विद्यार्थी ती सोडवून शिक्षकांकडे सादर करतात. यातून विद्यार्थ्यांमध्ये वाचण्याची व उत्तरे शोधून लिहिण्याची वृत्ती वाढीस लागते.
या परिक्षेमध्ये इयत्ता ५ ते १० च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामधून बहुतांश विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केले. इयत्ता ५ वी तील ऐश्वर्य मुंगमोडे हा विद्यार्थी प्रथम आला. व्दितीय श्रेया ठावरी, तृतीय श्लोक बोरकर तर चौथ्या क्रमांकावर नव्या तुपटे ही आली. इयत्ता ६ ते ७ मधील प्रथम क्रमांक लावण्या लाडे, व्दितीय आयुषी वानखडे, तृतीय कलश प्रधान आणि चौथ्या क्रमांकावर शुभ्रा नाकाडे, अनुष्का दोनाडकर, समन्वी डहारे यांनी संपादित केला. इयत्ता ८ ते १० मधील प्रथम क्रमांक तनिष्क धोंडाने, व्दितीय क्रमांकावर सोहम आखाडे व आदित्य मेंढे, तृतीय क्रमांकावर शुभम कोवे, श्रेया आंबोरकर, जोषा भरे हे होते.
प्रथम आणि व्दितीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना स्कुलच्या संचालिका आशिता भैया मॅडम यांचे हस्ते शिल्ड व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तर तृतीय आणि चौथ्या क्रमांकावर आलेल्या विद्यार्थ्यांना उख् पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले. पुढील स्पर्धेकरिता स्कुलचे अध्यक्ष तथा नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्थेचे सचिव अशोक भैया सर, संचालिका अशिता भैया मॅडम, मुख्याध्यापक कादिर कुरेशी, उपमुख्ध्याध्यापिका, पर्यवेक्षिका तसेच सर्व कर्मचारी वर्ग यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.