एकाच दिवशी दोन आत्महत्या व एक आकस्मिक मृत्यू
ब्रम्हपुरी/का.प्र.
ब्रम्हपुरी तालुक्यात एकाच दिवशी दोन आत्महत्या व एक आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना काल दि. ०९ जून २०२५ रोजी उघडकीस आली. यात ब्रम्हपुरी शहरातील शेषनगर येथील रहिवासी महिला संध्या सुभाष शिवणकर वय ४० हिने आपल्या राहत्या घरी सकाळच्या १०.३० वाजताच्या सुमारास नालयन दोरीने गळफास आत्महत्या केली.
तर दुसर्या घटनेत तालुक्यातील धानोली पोहा (चक) येथील लवकुश मंगरू बनकर वय ३७ याने दारूच्या नशेत स्वत:च्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली.
तर तिसरी घटना ब्रम्हपुरी शहरातील गीत पेट्रोल पंप जवळ घडली. गीत पेट्रोल पंप समोरील घर बांधकाम निर्माणधीन आहे. तिथे मजूर म्हणून सुनिल हरिशचंद्र राखडे वय २२ राह. खंडाळा हा कार्यरत होता. काम करीत असतांना, सुनिल राखडे याचे हातातील सळाखीचा जिवंत विद्युत तारेला स्पर्श झाल्यामुळे, विजेचा धक्का लागून सुनिल राखडे याचा जागीच मृत्यू झाला. ब्रम्हपुरी पोलिसांनी तिन्ही घटनेचा मर्ग दाखल केला असून भारतीय न्याय संहिता कलम १९४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.