गॅस दरवाढीच्या भडक्याने ब्रह्मपुरीत संताप! काँग्रेस आक्रमक; उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

   


ब्रह्मपुरी: केंद्र व राज्य शासनाने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये अचानक केलेल्या प्रचंड दरवाढीच्या निषेधार्थ ब्रह्मपुरी तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. "अच्छे दिन"चे स्वप्न दाखवून जनतेच्या खिशाला कात्री लावणाऱ्या सरकारचा यावेळी निषेध नोंदवत, उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले.
       शासनाने गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ केल्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. तसेच गॅस नोंदणीचा कालावधी वाढवल्याने नागरिकांच्या अडचणीत भर पडली आहे. ही दरवाढ म्हणजे जनतेचा विश्वासघात असून, शासनाने तातडीने दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली.
          या आंदोलनात ब्रह्मपुरीतील काँग्रेसचे दिग्गज नेते आणि पदाधिकारी एकवटले होते. यात प्रामुख्याने तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष हितेंद्र राऊत, कृउबा सभापती प्रभाकर सेलोकर, माजी जि.प.सदस्य प्रमोद चिमुरकर, नगराध्यक्ष योगेश मिसार, न.प.उपाध्यक्ष डॉ.नितीन उराडे, चिमुर विधानसभा अंतर्गत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नेताजी मेश्राम, न.प.नियोजन सभापती सचिन राऊत, न.प.पाणीपुरवठा सभापती सतीश हुमने, न.प.आरोग्य सभापती मनोज कावळे, नगरसेवक मोंटु पिलारे, नगरसेवक राकेश पडोळे, नगरसेवक चंद्रकांत बावनकुळे, नगरसेवक वकार खान, नगरसेवक पुष्पाकर बांगरे, महीला काँग्रेस अध्यक्ष योगिताताई आमले, महीला व बालकल्याण सभापती बबीताताई आमले, नगरसेविका रंजनाताई पीसे, नगरसेविका सपनाताई बल्लारपुरे, नगरसेविका रेणुताई ठेंगरी, नगरसेविका जयश्रीताई कुथे, नगरसेविका गिताताई मेश्राम, नगरसेविका ज्योतीताई राऊत, नगरसेविका रंजनाताई बुराडे, नगरसेविका हेमलता सिंहगडे, शहर काँग्रेस कार्याध्यक्ष सुधाकर पोपटे, जिल्हा काॅंग्रेस सचिव वासुभाऊ सोंदरकर, जिल्हा काॅंग्रेस सहसचिव गाजी पटेल, दलितमित्र प्रा.डि.के.मेश्राम, तालुका काँग्रेस सरचिटणीस गूरुदेव वाघरे, युवक काँग्रेसचे सरचिटणीस रुपेश बानबले, किसान सेल अध्यक्ष वामन मिसार, जनसंपर्क अधिकारी सुधीर पंदीलवार, उपसरपंच संदीप बगमारे, कृउबा संचालक अरुण अलोने, राममोहन ब्राडीया, सेवादल अध्यक्ष जाकीर शेख, सरपंच उमेश धोटे, शहर काँग्रेस उपाध्यक्ष सुनिल विखार, कृउबा संचालक केशव भुते, नेताजी पिसे, कृउबा संचालक ब्रम्हदेव दिघोरे, कृउबा संचालक किशोर राऊत, रवी मैंद, राहुल ठेंगरी, रिंकु पठाण, इक्बाल जेसानी, इंजी.अमोल सुकारे, सुधीर शिवरकर, अनमोल राऊत, महीला काँग्रेस कार्याध्यक्ष सुधाताई राऊत, महीला काँग्रेस सचिव सुशीलाताई सोंडवले, महीला काँग्रेस सोशल मीडिया प्रमुख रश्मी पगाडे, कमलेश मुळे, विलास दाणी, डेनी शेंडे, मुकुंदा राऊत, नितीन निहाटे, तुलचंद शिंगाडे, कृउबा संचालक किशोर बगमारे, गिरीश बुराडे, राहुल नेवारे, विलास मंडपे, नंदू भानारकर, जगदीश कलंत्री, सुरेश वंजारी, गोपी चिंचोळकर यांसह मोठ्या संख्येने काॅंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
      गॅस सिलिंडरची दरवाढ तात्काळ मागे घेऊन सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा, अन्यथा भविष्यात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेस कमिटीने दिला आहे.

  Post Views:   447




संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी