चिचखेडा परिसरातील नरभक्षी वाघ जेरबंद
ब्रम्हपुरी/का.प्र.
दिनांक १३ एप्रिलला विनायक विठोबा जांभुळे रा. चिचखेडा वय वर्षे ६० हे मोहाफुले गोळा करीत असतांना त्यांचेवर वाघाने हल्ला करुन ठार केलेले होते व त्या आधी पण एका व्यक्तीला ठार केले व दोन व्यक्तींना जखमी केले होते त्यामुळे मानव व वन्यजीव संघर्ष उदभवू नये याकरीता T-३ वाघाला जेरबंद करणे आवश्यक होते.
त्याअनुषंगाने दि. १७ एप्रिलला उत्तर ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रातील उपक्षेत्र मेंडकी नियतक्षेत्र चिचखेडा मधील कक्ष क्रमांक १५२ मध्ये पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी डॉट तयार करुन दिला त्यानंतर अजय सी. मराठे पोलीस हवालदार निशानेबाज यांनी T-३ वाघाला अचूक निशाणा लावून दुपारी १२.१५ वाजता डॉट मारुन जेरबंद करण्यात आले.