ने.हि. कन्या विद्यालयाच्या नऊ विद्यार्थीनी एनएमएमएस स्कॉलरशीपसाठी पात्र

पात्र विद्यार्थीनींना तब्बल चार वर्ष मिळणार वार्षिक १२ हजार शिष्यवृत्ती
   



ब्रम्हपुरी/का.प्र.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणार्‍या एन.एम.एम.एस. स्कॉलरशिप परीक्षेचा सत्र २०२४- २५ चा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यामध्ये नेवजाबाई हितकारणी कन्या विद्यालय, ब्रह्मपुरी येथील ९ विद्यार्थिनींची स्कॉलरशिप करिता निवड झाली. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील आठवीमध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेणे तसेच बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण करता यावे, यासाठी मानव संसाधन विकास मंत्रालय नवी दिल्ली मार्फत ही शिष्यवृत्ती योजना राबवली जाते. सदर उत्तीर्ण विद्यार्थिनींची सुमारे १२००० रुपये वार्षिक स्कॉलरशिप करिता निवड झालेली आहे. ही स्कॉलरशिप त्यांना चार वर्षे मिळणार आहे.  
नेवजाबाई भैय्या हितकारिणी शिक्षण संस्थेचे सचिव अशोकजी भैया यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली विद्यालय यशाची नवनवीन शिखरे सर करत असून विद्यालयाच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ब्रह्मपुरी तालुक्यामधून स्कॉलरशिप करिता सर्वाधिक विद्यार्थिनी ने.हि. कन्या विद्यालयाच्या पात्र झालेल्या आहेत. सदर उत्तीर्ण विद्यार्थिनींमध्ये कु. राजश्री संजय आंबोरकर, कु. पल्लवी दीनानाथ बुल्ले, कु. मैत्री गव्हर्नर रामटेके, कु. कांचन टिळक कांबळे, कु. निधी प्रशांत बावणे, कु. ज्ञानेश्वरी हिरालाल नाकतोडे, कु. रोहिणी ईश्वर बोरघरे, कु. प्रिन्सि भास्कर बोदेले , कु. सृष्टी प्रमोद सहारे या विद्यार्थिनींची स्कॉलरशिप करिता निवड झालेली आहे. ही स्कॉलरशिप त्यांना वार्षिक १२ हजार रूपये चार वर्षे मिळणार आहे.
ने.हि. कन्या विद्यालयात वर्षभरएन.एम.एम.एस. स्कॉलरशिप परीक्षेचे वर्ग नियमितपणे घेऊन त्यांना मार्गदर्शन देण्यात येते. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती स्नेहलताताई भैय्या, संस्थेचे सचिव अशोकजी भैय्या तथा शाळेच्या मुख्याध्यापिका प्रभा बनपूरकर मॅडम, उपमुख्याध्यापक विजय निखारे , पर्यवेक्षिका अर्चना खंडाते मॅडम, पालक प्रतिनिधी हिरालालजी नाकतोडे तथा सर्व शिक्षक, शिक्षिका कडून विद्यार्थिनींचे अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी संस्थेच्या वतीने संस्थेचे सचिव अशोकजी भैया यांच्या हस्ते विद्यार्थिनींना भेटवस्तू देता भावी काळात अथक मेहनत घेऊन स्पर्धा परीक्षामध्ये विद्यार्थिनींनी यश प्राप्त करावे असे मार्गदर्शन केले .
कार्यक्रमाचे संचालन खोब्रागडे सर यांनी तर आभार प्रदर्शन गहाणे सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण शिक्षकवृंद व विद्यार्थिनींनी सहकार्य केले.

  Post Views:   32



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी