ब्रह्मपुरीच्या पोलीस निरीक्षकपदी कांचन पांडे

   

ब्रम्हपुरी :
        जिल्हा पोलीस दलात सोमवारी (२८ सप्टेंबर) प्रशासकीय आणि विनंतीवरून बदल्यांचे मोठे आदेश धडकले. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या या यादीमुळे जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी बदलले असून, आता पोलीस वर्तुळात नव्या नियुक्त्यांचीच चर्चा रंगली आहे.
         या बदल्यांनुसार ब्रह्मपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद बानबले यांची गडचांदूर येथे बदली करण्यात आली आहे. तर सिंदेवाही येथून पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांची आता ब्रह्मपुरी पोलीस ठाण्याच्या ठाणेदारपदी वर्णी लागली आहे. प्रशासकीय गरज आणि अधिकाऱ्यांच्या विनंतीचा विचार करून हे फेरबदल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. नव्या ठाणेदारांच्या आगमनामुळे पोलीस ठाण्यांच्या कारभारात काय नवे बदल दिसतात, याकडे आता स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.

  Post Views:   399


संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी