ब्रम्हपुरी तालुका विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची ग्रामीण व शहर कार्यकारिणी गठीत
ब्रम्हपुरी/का.प्र.
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय सहकार्यवाह तथा नागपूर विभागाचे शिक्षक आमदार सुधाकरराव अड्बाले यांचे मार्गदर्शनाखाली नेवजाबाई हितकारिणी कन्या विद्यालय येथे सोमवारला सभेचे आयोजन करण्यात आले होते.
त्यात ब्रम्हपुरी तालुका ग्रामीण कार्यकारिणी अध्यक्षपदी कमलेश उंदिरवाडे, उपाध्यक्ष दिलीप साखरे, सुधीर राउत, चंद्रपाल माकडे, कु. तारिका धोटे, कार्यवाह श्रीहरी ठेंगरे यांची निवड करण्यात आली. तर ब्रम्हपुरी तालुका शहर कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष पदी अविनाश म्हस्के सर, उपाध्यक्ष जितेंद्र बेले, राजू काळूसे , माया कापगते , कु. सुरेखा कावळे, कार्यवाह पदी अतुल कानझोडे यांची निवड करण्यात आली. संचालन हटवार सर यांनी तर म्हस्के सर यांनी आभार मानले.