तुलानमाल शाळेत निरोप समारंभ संपन्न

   


ब्रम्हपुरी/का.प्र.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तुलानमाल येथे वर्ग आठवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळा समितीचे अध्यक्ष कालिदास ठाकरे, प्रमुख अतिथी सरपंच राजकुमार कुतरमारे, उपाध्यक्ष डाकरेस्वर बगळे, सदस्य सुनीता हानवते, अण्णाजी नागपुरे, प्रियांका मडावी, उज्ज्वला चहांडे, दुर्गा कार उपस्थित होत्या.   
  सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला हार घालून, दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. स्वागतगीत, पाहुण्यांचे स्वागत, अतिथीचे मनोगत, विद्यार्थी यांचे मनोगत झाले. प्रास्ताविक कुंभारे सर यांनी तर संचालन दिप्ती शेंद्रे हिने केले. कार्यक्रमाला जगदीश मेहेर, अशोक नागोशे, बोकडे, चंद्रशेखर चौधरी, नीलिमा यावलकर उपस्थित होते.

  Post Views:   65



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी