खंडणी वसूल करणार्याय ‘त्या’ दोघांवर गुन्हा नोंद

   


ब्रम्हपुरी/का.प्र.
बैल बाजारातून बैलजोडी खरेदी करून वाहनाने आपल्या स्व गावी नेत असतांना, मालवाहतूक गाडी  अडवून धमकी देत खंडणी वसूल करणार्याज शहरातील नामांकित खासगी बँकेतील ‘त्या’ दोन कर्मचार्या  विरूद्ध ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी भुजंगराव नागपूरे वय ४२ हे बोंडाळा बु. ता. मूल येथील रहिवासी आहेत. त्यांचा बैल खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. दि.३० मार्च २०२५ ब्रम्हपुरीत बैलबाजारात फिर्यादी यांनी बापू भोयर सहकार्याेसोबत बैलजोडी विकत घेतली. फिर्यादी सदर बैलजोडी मालवाहतूक गाडीतून गावाकडे गांगलवाडी पाथरी मार्गे जात असतांना, गांगलवाडी तळ्याजवळ ग्रे रंगाच्या जीपने त्यांचा रस्ता अडविला. सदर गे्र रंगाची जीपवर जप्ती वसूली पथक, ब्रम्हपुरी अर्बन को ऑप बँक अशा आशयाचे बॅनर व जीप क्रमांक एम.एच.३४ एए५५१२ असे लिहिले होते. 
त्यातील आरोपी देवराव नवघडे राह. ब्रम्हपुरी व आरोपी विनोद उपासे यांनी फिर्यादी व सहकार्यााकडून दोन हजार रूपयांची मागणी करून धमकाविले. परंतु फिर्यादीने आम्ही कास्तकार असून, दोन हजार रूपये न देता, दोनशे रूपये दिले. सदर प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर फिर्यादी यांनी याप्रकरणी ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात दोन्ही आरोपींविरूद्ध तक्रार दाखल केली. आरोपी देवराव नवघडे व आरोपी विनोद उपासे यांच्या विरूद्ध ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १२६ (२), ३०८ (२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  Post Views:   39



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी