नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयाच्या समीक्षा पंडीतचे वत्तृत्व स्पर्धेत सुयश

   

ब्रह्मपुरी/का.प्र.
येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयातील समीक्षा पंडीतने गोंडवाना विद्यापीठस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटाकावला असून सदर स्पर्धा यादवराव पोशट्टीवार महाविद्यालय, तळोधी (बा.) येथे आजचा युवक व समाजमाध्यमांचा प्रभाव या विषयावर नुकतीच पार पडली. 
सदर स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य डॉ. अमृत लंजेंनी केले. यावेळी अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी. अरुण प्रकाश तर परिक्षक म्हणून डॉ. धनराज खानोरकर, डॉ. विकास मोहतुरे, संतोष नन्नावार तर संयोजक डॉ. संजय चव्हाण, प्रा. उपेंद्र चिटमलवार उपस्थित होते. या स्पर्धेत २५ स्पर्धेकांनी आपला सहभाग नोंदविला. विजेत्या तीन स्पर्धेकांना रोख रक्कम, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. सहभागींना प्रमाणपत्र देण्यात आले. 
समीक्षा पंडीतचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.एच. गहाणे, उपप्राचार्य डॉ. सुभाष शेकोकर, प्रभारी डॉ. पद्माकर वानखडे व इतर कर्मचारी यांनी भरभरुन अभिनंदन केले.

  Post Views:   21



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी