ब्रम्हपूरी नगरपरिषद निवडणूक : नगरसेवक पदाच्या ५ जणांचे नामांकन अर्ज मागे
ब्रह्मपुरी/ महेश पिलारे
ब्रम्हपूरी नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक येत्या २ डिसेंबर रोजी पार पडणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी ४ तर नगरसेवक पदासाठी १०० उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले होते. आज २१ नोव्हेंबर २०२५ रोजी नामांकन अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख होती. यात नगरसेवक पदासाठी उभे असलेल्या ५ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले.
यात प्रभाग क्र. १(अ) सपना सुभाष खेत्रे (अपक्ष), (ब)नोगेश वासुदेव बगमारे(राष्ट्रवादी अजित पवार गट), प्रभाग क्र.४(अ) विवेक प्रेमलाल मेश्राम (अपक्ष), अनुकूल राजकुमार शेंडे (शिवसेना),
प्रभाग क्रं.६ (अ) ममता शालू मालाधरे (अपक्ष) यांनी आपले नामांकन मागे घेतले आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी ४ जण तर नगरसेवक पदासाठी ११ प्रभागातुन ९५ उमेदवार रिंगणात उरले आहेत. चिन्ह वाटप झाल्यानंतर, ब्रह्मपुरी नगरपालिका निवडणूक चुरशीची ठरणार आहे हे मात्र खरं.