नेवजाबाई भैय्या हितकारिणी सार्वजनिक गणेश मंडळाच्या बाप्पाचे विसर्जन
ब्रह्मपुरी
ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बाप्पा विराजमान झाले आणि 6 सप्टेंबर रोजी, गुरुवारी त्यांचा निरोप घेण्यात आला. ब्रह्मपुरी तालुक्यातील प्रसिद्ध नेवजाबाई भैय्या हितकारिणी सार्वजनिक गणेश मंडळाच्या मंडपातील विराजमान गणपती बाप्पांना ढोलताशांच्या गजरात आणि गुलालाची उधळण करत निरोप देण्यात आला. गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी लोकांनी ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. विसर्जनाची दृश्य अप्रतिम होते. नेवजाबाई भैय्या हितकारिणी सार्वजनिक गणेश मंडळाच्या बाप्पाचे विसर्जन मिरवणुकीत अनेक भाविक सहभागी झाले होते मिरवणुकीत पुष्पवृष्टी, पुष्पहार आणि गुलालाची उधळण यांनी रंगत भरली.
महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला दिलेल्या राज्य महोत्सवाच्या दर्ज्यानुसार, या वर्षीचा उत्सव ब्रह्मपुरीत अभूतपूर्व जल्लोषात पार पडला. नेवजाबाई भैय्या हितकारिणी सार्वजनिक गणेश मंडळाने पंधरा वर्षांपासून अविरत सुरू असलेली परंपरा जपत 27 ऑगस्ट ला गणेश चतुर्थीच्या दिवशी मोठ्या भक्ती भावाने बाप्पाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली. दहा दिवसांपर्यंत आरती, स्त्रोत, भजन मंत्रपठण असे मंगलमय वातावरण मंडळात पाहायला मिळाले. मंडळांने लोकांच्या मनोरंजनासाठी आनंद मेळावा याचे आयोजन केले होते. प्रेक्षणीय चित्रपीत स्वरूपात देखावा ह्या स्वरूपात भक्तीभावासाठी वातावरण तयार केले होते. त्यामुळे दहा दिवस ब्रह्मपुरी शहर व तालुका भक्ती सागरात आकंठ बुडाला होता.
14 विद्या व 64 कलांचा अधिपती असलेल्या विघ्नहर्ता गणरायाला अनंत चतुर्थीच्या दिवशी जड अंतकरणाने निरोप दिला. नेवजाबाई भैय्या हितकारिणी सार्वजनिक गणेश मंडळाच्या मंडपातील बाप्पाची मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात शहरातील मुख्य मार्गाने काढण्यात आली. अशोक सम्राट चौक, रेणुका माता चौक, मर्दान अली चौक, बाजार चौक आदि. मार्गाने मार्गक्रमण होत कोट तलाव येथे मिरवणुकीची सांगता झाली. यावेळी मंडळाचे पदाधिकारी माजी नगरसेवक तथा प्रसिद्ध उद्योजक गौरव भैया व आशिता भैया यांच्या हस्ते आरती करून बाप्पांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. 'निरोप घेतो देवा आज्ञा असावी, चुकले आमचे काही तर क्षमा असावी' अशा भावनेने सर्वांनी गणपती बाप्पांचे दर्शन घेत विसर्जन केले.