निरंतर संघर्ष करणाराच स्वप्नांची पूर्तता करतो - एपीआय शितल खोब्रागडे

   


ब्रम्हपुरी/का.प्र.
‘‘आपल्या देशाला लढवय्या शूर स्त्री विरांगणाचा इतिहास आहे. आलेल्या संकटावर मात करून परिस्थितीशी दोन हात केले आणि अखंड भारताच्या सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात अनेक समाजसुधारक जन्मास आले. तो संघर्षाचा इतिहास विसरता कामा नये. मी ग्रामीण भागातील आहे, मी गरीब आहे, माझी परिस्थिती नाही मला सुख सुविधा नाही असे रडगाणे न सांगता, जी विद्यार्थिनी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या परिस्थितीला बदलविण्यासाठी सतत संघर्ष करते. जिद्दीने पेटून उठून आत्मविश्वासाने कठोर मेहनतीने आलेल्या प्रत्येक खाच खळग्यांना पार करते ती कधीच हार मानीत नाही तर यशाला गवसणी घाऊन इतरांना आदर्शवत ठरते,’’ असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील एन सी सी गर्ल्स यूनिट प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनी तर्फे आयोजित निरोप समारंभ कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक स्थानावरून शितल खोब्रागडे यांनी केले.  एकदा अपयश आले म्हणून खचून न जाता सतत प्रयत्न करीत रहा.स्व अनुभव आणि जीवनाची वास्तविकता कथन करून मी करू शकते तुम्ही का नाही यातून प्रेरणादाई विचार मांडले.
स्थानिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील एन सी सी गर्ल्स युनिटच्या वतीने आयोजित निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवेश कांबळे होते.  कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या सदस्या रीमा कांबळे, प्रा.डॉ. सिंग्धा कांबळे, कोमल घाडगे पी एस आय पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून शीतल खोब्रागडे ए पी आय. पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी व प्रशांत डांगे पत्रकार ब्रम्हपुरी हे होते. यावेळेस उत्तम कार्य करणार्‍या एनसीसी कॅडेटचे मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक लेप्ट. प्रा. सरोज शिंगाडे यांनी केले तर सूत्रसंचालन एन सी सी कॅडेट सपना पंचभाई हिने केले. मान्यवरांचे आभार त्रिवेणी ठाकरे हिने मानले.

  Post Views:   22



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी