विज्ञान मंथन परीक्षेत नेवजाबाई हितकारिणी विद्यालयाची उज्वल कामगिरी

राज्यस्तरीय परीक्षेसाठी दोन विद्यार्थी पात्र
   

ब्रह्मपुरी :
  भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT) यांच्या सहकार्याने विज्ञान भारती उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थी विज्ञान मंथन (VVM) राष्ट्रीय विज्ञान प्रतिभा शोध परीक्षा २०२५–२६ मध्ये नेवजाबाई हितकारिणी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, ब्रह्मपुरी येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
  विद्यालयातील विज्ञान शिक्षिका कुमारी सोनाली कलकोटवार मॅडम यांच्या मार्गदर्शनात इयत्ता दहावीतील साईनाथ भाऊराव आत्राम आणि अभिजीत कृष्णा किरमीरे या दोन विद्यार्थ्यांनी विभागीय स्तरावरील परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण करत राज्यस्तरीय परीक्षेसाठी पात्रता मिळवली आहे. विशेष बाब म्हणजे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातून निवड झालेल्या अवघ्या १४ विद्यार्थ्यांमध्ये या विद्यालयातील दोन विद्यार्थ्यांचा समावेश असून, त्यांनी महाराष्ट्रातील अव्वल २५ विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवले आहे.
       या दोन्ही विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयातील सखोल ज्ञान, तर्कशुद्ध विचारशक्ती व सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर हे यश संपादन करून शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची प्रचिती दिली आहे. त्यांच्या या यशामुळे विद्यालयाचा नावलौकिक वाढला असून परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
     विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे सचिव आदरणीय श्री. अशोकजी भैया, मुख्याध्यापक श्री. के. एम. नाईक सर, उपमुख्याध्यापक श्री. एन. डब्ल्यू. नाकाडे सर, पर्यवेक्षक श्री. पी. आर. जीभकाटे सर, तसेच सर्व शिक्षकवृंदांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

  Post Views:   71




संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी