व्यापार युध्द
व्यापार युद्धात जिंकणारे ते लढणारे नसतात, त्यांचे फायदे लढाईचा भाग नसलेल्या मूक प्रेक्षकांना मिळतात. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात चिनी उत्पादनांवरील टेरिफचा परिणाम म्हणून मलेशिया, व्हिएतनाम, थायलंडला फायदा झाला. अमेरिकेने आपल्या तीन सर्वात मोठ्या व्यापारी भागीदारांशी मेक्सिको, कॅनडा आणि चीनशी व्यापार युद्ध पुकारले आहे. ट्रम्प यांनी पहिले पाऊल उचलत मेक्सिको आणि कॅनडामधून होणार्या आयातीवर २५ज्ञ् आणि चीनमधून होणार्या आयातीवर १०ज्ञ् अशा दोन टप्प्यांत २०ज्ञ् कर लादला. चीन व कॅनडाने अमेरिकेच्या निवडक निर्यातीवर टेरिफ लादून प्रत्युत्तर दिले. त्यांनी आणखी वस्तूंवर कर लावण्याची धमकीही दिली. मेक्सिकोही तेच करत आहे. ही लढाई कोण जिंकेल ? ट्रम्प असे दाखवत आहेत की जणू ते आधीच जिंकत आहेत. पण, व्यापार युद्धात जिंकणारे ते लढणारे नसतात. त्यांचे फायदे लढाईचा भाग नसलेल्या मूक प्रेक्षकांना मिळतात. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात चिनी उत्पादनांवरील टेरिफमुळे व्यवसायिकांना त्यांचे उत्पादन सुविधा मलेशिया, व्हिएतनाम आणि थायलंडमध्ये हलवावे लागले.
ट्रम्प म्हणतात की, ते आता सुरुवात करत आहेत. अमेरिकेच्या करवाढीचा सामना करणार्या देशांची यादी मोठी आहे. ट्रम्प यांनी ०२ एप्रिलला म्हटल्याप्रमाणे मोठ्या संख्येने देशांवर समान दराने कर लादले तर जागतिक व्यापारातील घसरणीमुळे जगभरात मंदी येऊ शकते. ट्रम्प यांनीही ते नाकारलेले नाही. एक काळ असा होता की अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना मंदीची भीती वाटत असे, पण ट्रम्प यांना वाटते की, ते मंदीपासून सुरक्षित आहेत. व्यवसायांना ते कोणती स्पष्टता देऊ शकतात, असे विचारले असता ते म्हणाले कालांतराने टेरिफ वाढू शकते. कॅनडा व मेक्सिकोवरील टेरिफ दीर्घकाळ चालू राहिले तर या अर्थव्यवस्था नष्ट होतील. दोन्ही देश अमेरिकेवर खूप अवलंबून आहेत. अमेरिका कॅनडाच्या ७५ज्ञ् व मेक्सिकोच्या ७७ज्ञ् निर्यातीचा खरेदीदार आहे. मेक्सिकन जीडीपीत निर्यातीचा वाटा ३६ज्ञ् आहे आणि कॅनडात ३३ज्ञ् आहे. त्यामुळे ट्रम्पच्या आयात शुल्कामुळे अमेरिकेच्या दोन शेजारी देशांच्या जीडीपीच्या किमान एकचतुर्थांश भागावर परिणाम होईल आणि त्यांना मोठ्या मंदीमध्ये ढकलले जाईल. मेक्सिकन अर्थव्यवस्था मंदीत गेली तर मेक्सिकोमधून येणारे स्थलांतर आताइतके कमी राहणार नाही. व्यापारयुद्ध थांबवण्यासाठी ट्रम्प या देशांकडून त्या बदल्यात काय इच्छितात हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मेक्सिकोवर टेरिफ लादण्यामागील तर्क बेकायदेशीर स्थलांतर व फेंटेंनिल औषधाची निर्यात थांबवणे हा होता. बेकायदेशीर स्थलांतरितांचे आगमन जवळजवळ थांबले आहे. मेक्सिकोने २९ ड्रग्ज टोळ्यांतील नेत्यांना अमेरिकेकडे प्रत्यार्पण केले आहे. मेक्सिकन राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शेनबॉम यांनी दक्षिण सीमेवर १०,००० अत्तिरिक्त सैन्य तैनात केले आहे. पण, या सगळ्यानंतर मेक्सिकोला काय मिळाले? निर्यातीवर २५ज्ञ् टेरिफ !
कॅनडावर टेरिफ लादण्याचे कारण आणखी अस्पष्ट आहे. उत्तरेकडील सीमेवरून स्थलांतरितांचा प्रवाहही कमी आहे, तसेच फॅटॅनिल ड्रग्जची तस्करीही कमी आहे. पण, कॅनडा आता आपली अर्थव्यवस्था मोठ्या मंदीत जाण्यापासून रोखण्यासाठी काय करेल? आणि टेरिफचा प्रकोप टाळण्यासाठी चीनने काय करावे ? लक्षात ठेवा, मेक्सिको, कॅनडा व चीनवरील कर परस्परविरोधी नाहीत. ट्रम्प दावा करत आहेत की, उच्च दर लादून ते उत्पादकांना अमेरिकेत येण्यास भाग पाडतील. त्यांनी त्यांच्या स्टेट ऑफ द यूनियन भाषणात असेही म्हटले होते की, त्यांनी अमेरिकेत उत्पादन केले तर त्यांना शुल्क भरावे लागणार नाही म्हणून ते येतील. ट्रम्पसाठी टेरिफ धोरण म्हणजे अमेरिकेला पुन्हा महान बनवणे, परंतु, अमेरिकन लोक ट्रम्पच्या दुटप्पी मानकांना आत्मसात करत असताना जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या गर्तेत जाईल, अशी भीती वाढत आहे.