सहकार सप्ताहात श्री बालाजी नागरी पतसंस्थेचा वृक्षारोपण उपक्रम
ब्रम्हपुरी, दि. ३ जुलै :
सहकार सप्ताहानिमित्त सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, ब्रम्हपुरी व श्री बालाजी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, ब्रम्हपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने ने. ही. महाविद्यालय प्रांगण, ब्रम्हपुरी येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. अशोक कि. भैया, अध्यक्ष, श्री बालाजी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, ब्रम्हपुरी हे होते. कार्यक्रमास मा. श्री. स्वप्नील बा. पाटील, सहाय्यक निबंधक तसेच मा. श्री. सचिन धात्रक, सहकारी संस्था, ब्रम्हपुरी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संस्थेचे संचालक मंडळ तसेच कर्मचारी उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते विविध वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. वृक्षारोपणाबरोबरच वृक्षांचे संगोपन करणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी असल्याचे यावेळी प्रतिपादन करण्यात आले. तसेच, सहकार क्षेत्राने सामाजिक उत्तरदायित्व जपत पर्यावरणपूरक उपक्रम सातत्याने राबविण्याची गरज असल्याचेही नमूद करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री बालाजी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, ब्रम्हपुरी यांच्या संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.