अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार

   

ब्रह्मपुरी 

       विरुद्ध दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवून दुचाकीस्वारास जबर धडक दिल्याने त्यात दुचाकीस्वार युवक गंभीर जखमी होऊन उपचारा दरम्यान मृत पावल्याची घटना नुकतीच घडली. 
          फिर्यादी संकेत विनोद तासलवार यांनी ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा चुलत भाऊ सारंग जनार्दन चिमूरकर वय 26 वर्ष हा स्वतःची बजाज पल्सर मोटरसायकल क्रमांक एम एच 34 बी एम 1399 गाडीने पारडगाव येथून ब्रह्मपुरी कडे येत होता. उदापूर येथील प्रभू कृपा राईस मिल जवळ त्याच्या दुचाकीला विरुद्ध दिशेने आरमोरी कडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवून समोरून ठोस मारली. यात सारंग चिमुरकर गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळताच, फिर्यादी संकेत तासलवार हे घटनास्थळाकडे जायला निघाले. रेल्वे क्रॉसिंग जवळ एका कारमध्ये त्यांचा चुलत भाऊ सारंग चिमुरकर याला गंभीर जखमी अवस्थेत उपचाराकरीता खाजगी रुग्णालयात नेत असल्याचे दिसून आले. फिर्यादी संकेत हे कारच्या मागे खाजगी हॉस्पिटल येथे गेले असता, उपचारा दरम्यान सारंग चा मृत्यू झाला.
       अज्ञात वाहन चालकाविरुद्ध ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 134, 184, भारतीय न्याय संहिता कलम 106 (1), 281 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय रेखलाल गौतम हे करीत आहेत.

  Post Views:   2129



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी