अमानुष मारहाण प्रकरणी समाज संवेदनाहीन
अर्ध्या महिन्याचा कालावधी उलटला, 'तो' विद्यार्थी अद्यापही न्यायाच्या प्रतिक्षेत
ब्रह्मपुरी/महॆश पिलारॆ
अतिशय शुल्लक कारणावरून शिक्षकांने विद्यार्थ्याला केलेल्या अमानुष मारहानीचे फोटो व बातम्या सर्वत्र व्हायरल झाल्या. सोशल मीडियावर राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक यांनी घडलेला घटनेचा निषेध नोंदविला खरा. परंतु 'त्या' अमानुष मारहाण झालेला विद्यार्थ्याला न्याय देण्यासाठी कुणीही धजावलं नाही. शैक्षणिक नगरीत एवढा गंभीर गुन्हा घडत असतांना सुद्धा, ना प्रशासनाने गंभीरता दाखविली, ना समाजातील सुज्ञ नागरिकांनी? संवेदनाहीन समाजाने डोळे बंद करून पाहण्याची भूमिका ठेवली. त्यामुळे अर्ध्या महिन्याचा कालावधी उलटून सुद्धा 'त्या' अमानुष मारहाण झालेल्या विद्यार्थ्याला अद्यापही न्याय मिळाला नाही. 'तो' अमानुष मारहाण झालेला विद्यार्थी अजूनही न्यायाच्या प्रतिक्षेत आहे.
मांगली येथील जिल्हा परिषद शाळेत केवळ 'स्कूल' या शब्दाची स्पेलिंग न आल्यामुळे तेथील शिक्षकाने विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केली. शिक्षकाने विद्यार्थ्याला केलेल्या अमानुष मारहाणीचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. प्रसार माध्यमांनी अमानुष मारहाण झाल्याच्या बातम्या प्रकाशित केल्या. सामाजिक कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक व राजकीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी सदर घटनेविषयी सोशल मीडियावर रोष व्यक्त केला. परंतु वास्तवात कुणीही समोर आले नाही. पूर्व विदर्भातील शिक्षणाचे माहेरघर असलेल्या ब्रह्मपुरी या शैक्षणिक नगरीत इतका गंभीर गुन्हा घडला असताना सुद्धा, त्याची साधी दखल कुठल्याच लोकप्रतिनिधींनी घेतली नाही, हे विशेष. एरवी छोट्या मोठ्या प्रश्नांवर तुटून पडणारे लोकप्रतिनिधी एवढा गंभीर गुन्हा डोळ्यासमोर उभा असताना सुद्धा, त्याचे तोंडातून सदर प्रकाराविषयी 'ब्र' सुद्धा काढत नाहीत, हे खरंच कितपत योग्य आहे.
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते त्यांना सुद्धा या प्रकाराविषयी गंभीरता वाटली नाही, हे सुद्धा या प्रकारापासून अनभिज्ञ तर नाही ना? असा सवाल उपस्थित होत आहे. खंडणीचा व्हिडिओ व्हायरस झाल्यानंतर खंडणी देणाऱ्या फिर्यादीस बोलवून खंडणी घेणाऱ्या विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली जाते. परंतु अमानुष मारहाण झाल्याचे फोटो व्हायरल झाले असताना सुद्धा पोलीस प्रशासन त्याची साधी चौकशी करीत नाही? कुठलीच भूमिका घेत नाही? अमानुष मारहाण करणाऱ्या शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद केल्या जात नाही? असे अनेक प्रश्न नागरिकांत चर्चेद्वारे उपस्थित होत आहेत.
विदर्भातील शिक्षणाचे माहेरघर असलेल्या ब्रह्मपुरी सारख्या सांस्कृतिक, शैक्षणिक नगरीत शिक्षकाकडून विद्यार्थ्याला होत असलेल्या अमानुष मारहाणीची घटना समाजाला अंतर्मुख करणारी आहे, असे असताना सुद्धा संवेदना बधिर झाल्यागत सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक वागलेत. हे ही तितकच खरं आहे. 'त्या' अमानुष मारहाण झालेला विद्यार्थ्याला न्याय देण्यासाठी कुणीही धडपड केली नाही. संवेदनाहीन समाजाने डोळे बंद करून पाहण्याची भूमिका घेतल्यामुळे अर्ध्या महिन्याचा कालावधी उलटून सुद्धा 'त्या' अमानुष मारहाण झालेल्या विद्यार्थ्याला अद्यापही न्याय मिळाला नाही. शिक्षक दिनाच्या दिवशीसुद्धा 'तो' अमानुष मारहाण झालेला विद्यार्थी अजूनही न्यायच्या प्रतीक्षेत आहे. कोवळ्या वयातच त्याच्यासोबत घडलेला हा हृदयद्रावक प्रसंग त्याच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम करणारा ठरू शकते.