ब्रम्हपुरीत श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा उत्साहात संपन्न
ब्रम्हपुरी/का.प्र.
येथील जाणी वार्ड (रामनगर) मधील श्री गोविंद महाराज स्मृती श्रीराम मंदिरातून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्रीरामनवमी उत्सव समितीव्दारा आयोजित श्री रामजन्म शोभायात्रा उत्साहात संपन्न झाली. सायंकाळी ७ वाजता श्रीराम, जानकी, लक्ष्मण यांच्या मूर्ती विधीवत रथारूढ झाल्यावर फटाक्यांच्या आतिषबाजीत व श्रीरामांच्या जयघोषात शोभायात्रेला प्रारंभ झाला. सुरूवातीला राजस्थानी समाजातर्पेâ विद्युत रोषणाईत आकर्षक रथावरील श्रीराम, जानकी, लक्ष्मण, हनुमंत वेषातील बाल कलाकारांनी साकारलेली आकर्षक झॉकी होती.
त्यानंतर चातुर्मास उत्सव समिती, विहिंप, राष्ट्रसेविका समिती, रा. स्व. संघ, चर्मकार समाज, राजस्थानी समाज, शिवजयंती उत्सव समिती यांच्यासह इतर झॉकी, गुरूमाऊली भजन मंडळ, शिव मंदिर मंडळ माहेर यांची दिंडी व मोठ्या संख्येने श्रीरामभक्त बंधू, भगिनी श्रीराम जन्म शोभायात्रेत सहभागी झाले. मार्गात ठिकठिकाणी श्रीराम रथातील मूर्तींचे पूजन झाले तसेच स्वागत करण्यात आले. राजस्थानी समाजातर्पेâ मार्गात सावरकर चौकालगत महाप्रसाद वितरीत करण्यात आला. व्यापारी संघटनेद्वारे शोभायात्रेत सहभागी श्रीराम भक्तांना शितपेय वितरीत करण्यात आले.
डिजेवरील धार्मिक गीतांवर ताल धरणारे बजरंगी व युवा कार्यकर्ते तसेच चर्मकार समाजाची आकर्षक संत रविदास दर्शन, रा. स्व. संघाद्वारे ‘देव देश व धर्मासाठी' दैनिक शाखेतून तयार होणारी संस्कारीत पिढी निर्माण, राष्ट्रसेविका समितीच्या वं. मावशी केळकर (समिती संस्थापिका)यांच्याव्दारे रामकथा देखावा यामुळे धार्मिकतेसोबतच राष्ट्र भावनेचा जागर शोभायात्रेतून झाला. शोभायात्रेचा संपूर्ण मार्ग तोरणे, भगवे ध्वज, फलक याव्दारे सजला होता. शोभायात्रा श्रीराम मंदिरात परतल्यावर आरती, महाप्रसादाने शोभायात्रेची सांगता झाली.