किन्ही येथे श्रीराम जन्मोत्सव व भागवत सप्ताह

   


ब्रम्हपुरी /का.प्र.
तालुक्यातील किन्ही येथील श्रीराम मंदिर देवस्थान येथे श्रीराम नवमी निमित्त रविवार, दिनांक ०६ एप्रिल २०२५ रोजी श्रीराम जन्मोत्सव व सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. या धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमूरकर उपस्थित होते. 
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अन्नाजी ठाकरे बाबुसाहेब रुई, सुरेशजी दर्वे किन्ही, ताराचंदजी पारधी उपसरपंच खरकडा, योगेश ढोरे, प्रमोदजी मोटघरे ब्रह्मपुरी, पुंडलीकजी प्रधान किन्ही उपस्थित होते.
या कार्यक्रमाआधी श्रीराम नवमीच्या पार्श्वभूमीवर दिनांक ३० मार्च २०२५ पासून श्रीराम ज्ञानदान भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रसिद्ध भागवतकार ह.भ.प. शामसुंदर महाराज (इंजोरी, ता. अर्जुनी, जि. गोंदिया) यांच्या मधुर वाणीतील प्रवचनांनी ग्रामस्थांचे मनोबल उंचावले. सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रम, भजन-कीर्तन व सामूहिक सहभागाचे आयोजन करण्यात आले होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन श्रीराम मंदिर देवस्थानच्या वतीने करण्यात आले होते.

  Post Views:   20



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी