अर्धसाप्ताहिक ब्रह्मपुरी समाचार चा प्रथम अंक 15 ऑगस्ट 2015 ला वाचकाच्या सेवेत रुजू झाला. तेव्हापासून अविरत प्रकाशित होत आहे. पत्रकारिता क्षेत्रात प्रवेश हे धाडसाचे सामाजिक कार्य आहे, हीच आमची प्रामाणिक भावना आहे.
ब्रह्मपुरीचे प्रथम नगराध्यक्ष व सुप्रसिद्ध उद्योगपती अशोक भैया यांनी सामाजिक बांधिलकी पोटी "ब्रह्मपुरी समाचार"ची मुहूर्तमेढ रोवली. याआधी अनेक साप्ताहिक, वृत्तपत्रे ब्रह्मपुरी तालुक्यात प्रकाशित झाली आणि होत आहेत. परंतु आमचे वृत्तपत्र मात्र वेगळे आहे. आमच्या वृत्तपत्रात खोटेपणा, सनसनाटी बातम्या, बदनामीकारक लेख, अवाजवी टीका या गोष्टींना स्थान नाही. आपण अनुभवले असेल वस्तुनिष्ठ बातम्या लोकशाही मूल्ये जपून वाजवी भाष्य, भ्रष्टाचारावर प्रहार, अन्यायग्रस्तांना न्याय, शेतकऱ्यांच्या समस्या, सामाजिक समस्यांवर विशेष भर ही आमची आगळीवेगळी वैशिष्ट्ये आहेत.
मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गोपाळ गणेश आगरकर प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे यांच्यासारख्या महान पत्रकारांचा वारसा पुढे न्यावा याच हेतूने "ब्रह्मपुरी समाचार"ची सुरुवात झाली. अगदी अल्पावधीतच वाचकांच्या हृदयात स्थान निर्माण केले. वाचकांच्या प्रेमाने आम्हाला वृत्तपत्राच्या माध्यमातून समाज सेवा करण्याची प्रेरणा दिली.
पत्रकारितेच्या प्रवासामध्ये अनेक अडचणी आल्यात. आमच्यावर अवाजवी टीका सुद्धा झाली. परंतु न घाबरता आमचा प्रवास सतत सुरू आहे. आमच्या ध्येयावर आम्ही ठाम आहोत तोपर्यंत कोणतीही शक्ती आम्हाला आमच्या सामाजिक कर्तव्यापासून रोखू शकत नाही. वाचकांचा विश्वास हीच आमची पुंजी आहे.
यापुढे ब्रह्मपुरी समाचार चा ई-अंक प्रकाशित होत आहे. वाचकांना घरबसल्या मोबाईलच्या माध्यमातून वृत्तपत्र वाचता येणार आहे.