इंग्रजी ही लोकल ते ग्लोबल भाषा - डॉ़ युवराज मेश्राम

ने.हि. महाविद्यालयातील एफडीपी कार्यक्रमात प्रतिपादन
   

ब्रह्मपुरी/का.प्र.
 ‘वर्तमान जीवनात इंग्रजी भाषेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. इंग्रजी भाषा ही विविधांगी रोजगाराचे केंद्र आहे. ही भाषा तरुणांसाठी त्यांच्या जगण्याचे साधन बनलेली आहे. जगातील वाचकांना गाजलेल्या हजारो राष्ट्रभाषा, बोलीभाषा आणि इतर भाषेतील साहित्याचे वाचन इंग्रजीमुळे शक्य झाले आहे, त्यामुळे इंग्रजी भाषा हे लोकल ते ग्लोबल भाषा केंद्र ठरते.' असे बहूमूल्य विवेचन डॉ. युवराज मेश्रामांनी केले. ते सहा दिवसीय एफडीपी कार्यक्रमात ‘भाषा : वर्डवाईड इंग्लिश’ या' विषयावर बोलत होते.
 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. धनराज खानोरकर होते. तर प्रमुख उपस्थितीत उपप्राचार्य डॉ. सुभाष शेकोकर, डॉ.रेखा मेश्राम, डॉ.राजेंद्र डांगे, डॉ. किशोर नाकतोडे, डॉ. रतन मेश्राम उपस्थित होते. याप्रसंगी आपल्या अध्यक्षीय मनोगतात डॉ. खानोरकरांनी, भाषा कोणतीही असो ती आपल्या जगण्याचा हुकांर असतो. इंग्रजी जगाची ज्ञानखिडकी आहे पण मातृभाषा ही आपली माय असून त्यातून आपण पूर्ण व्यक्त होतो. शेवटी व्यक्तीने बहुभाषिक होणे महत्त्वाचे असे मार्गदर्शन केले. कार्यक्रम प्राचार्य डॉ. डी. एच. गहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.
 कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. किशोर नाकतोडे, संचालन व आभार प्रदर्शन प्रा.जयेश हजारेंनी केले. यशस्वीतेसाठी डॉ. अरविंद मुंगोले, डॉ.भास्कर लेनगुरेंनी सहकार्य केले. कार्यक्रमाला प्राध्यापकवृंद उपस्थित होता.

  Post Views:   49



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी