कार्तिक पौर्णिमेनिमित्त पिंपळगाव (खरकडा) येथे गोपालकाला, जाहीर कीर्तन आणि मान्यवरांचा सत्कार सोहळा

   

 ब्रम्हपुरी:-                                                                कार्तिक पौर्णिमेनिमित्त पिंपळगाव (खरकडा) येथे दिनांक ६ आणि ७ नोव्हेंबर रोजी गोपालकाला, जाहीर कीर्तन आणि मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. पिंपळगाव (खरकडा) येथील ८१ वर्षांची गोपालकाला परंपरा सुरू ठेवत, यावर्षी कार्तिक महिन्यात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम गावाच्या समृद्धीचे आणि धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांचे जतन करण्याचे प्रतीक आहे. हा सोहळा गावातील प्रतिष्ठीत नागरिक नानाजी तुपट यांच्या घरी होणार आहे. ६ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता राजुली, तहसिल अर्जुनी येथील रहिवासी पू. लीलाबाई तुलाराम मस्के यांचे सामाजिक जागृतीपर जाहीर कीर्तन होणार आहे. ७ नोव्हेंबर रोजी शुक्रवार दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत लीलाबाईंचे जाहीर कीर्तन होणार आहे. त्यानंतर निवडक मान्यवरांच्या सत्काराचा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. चिमूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया आणि चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष कृष्णलाल सहारे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर सत्कारमूर्ती म्हणून कवडू तुपट व धृपता तुपात राह. शिवराजपूर, यादव उरकुडे, बळीराम राऊत राह. बेटाळा, माजी सरपंच मुखरूजी पारधी, माजी सरपंच मुखरूजी ठाकरे राह. खरकाडा, उद्योजक दीपक उराडे ब्रम्हपुरी हे उपस्थित राहणार आहेत. सत्कार समारंभ कार्यक्रमा नंतर दुपारी ४ वाजता गोपालकाल्याचे व महाप्रसाद वितरणाचे आयोजन करण्यात आले आहे. 
कार्यक्रमाचे आयोजन सेवा सहकारी सोसायटी किन्ही चे अध्यक्ष नानाजी तुपट, दादाजी तुपट, प्रयागदास तुपट, मंगेश तुपट, चरणदास तुपट, योगेश तुपट आणि संपूर्ण तुपट कुटुंब, ग्रामपंचायत, वारकरी मंडळ यांनी केले आहे. पिंपळगाव मधील हा कार्यक्रम गावातील एकता, धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकीचे स्पष्ट प्रतिबिंब आहे. गोपाळकालासारखे कार्यक्रम ग्रामीण समुदायांमध्ये अध्यात्म, भक्ती आणि सांस्कृतिक वारशाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे एक साधन बनत आहेत. शांती, अहिंसा आणि समाजसेवेला समर्पित या विशेष कार्यक्रमात सर्वांना सहभागी होण्याचे आवाहन आयोजन समितीने केले आहे.

  Post Views:   85




संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी