नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात एनसीसी ‘बी’ सर्टिफिकेट परीक्षा संपन्न

   

ब्रह्मपुरी/का.प्र.
नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय, ब्रह्मपुरी येथे दि. १५ आणि १६ मार्च रोजी एनसीसी बी सर्टिफिकेट परीक्षा यशस्वीरीत्या पार पडली. एनसीसीच्या द्वितीय वर्षातील कैडेट्ससाठी ही परीक्षा अत्यंत महत्त्वपूर्ण असते. ही दोन दिवसीय परीक्षा १५ मार्च रोजी प्रायोगिक आणि १६ मार्च रोजी लेखी स्वरूपात घेण्यात आली. प्रायोगिक परीक्षेत फिल्ड क्राफ्ट आणि बॅटल क्राफ्ट, कम्युनिकेशन, नकाशा वाचन (मॅप रीडिंग), शस्त्र प्रशिक्षण (वेपन ट्रेनिंग स्कील) आणि ड्रिल टेस्ट या विषयांवर मूल्यमापन करण्यात आले.
या परीक्षेसाठी नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, ब्रह्मपुरी येथील एकूण १०७ कैडेट्स उपस्थित होते. परीक्षेचे नेतृत्व कर्नल समिक घोष (कमांडिंग ऑफिसर, वर्धा) आणि लेफ्टनंट कर्नल अभिनव शर्मा (कमांडिंग ऑफिसर, नागपूर) यांनी केले. तसेच लेफ्टनंट अभिजीत परकरवार, कॅप्टन कुलजीत शर्मा, लेफ्टनंट सरोज शिंगाडे, केअरटेकर ऑफिसर रेवनदास बोरकर, नायब सुभेदार जसविंदर सिंग, नायब सुभेदार विजय कुमार, हवालदार मुकेश, हवलदार कुलजीत सिंग, हवलदार रिंकू सिंग आणि हवलदार पाटिल आणि इतर स्टाफ परीक्षेसाठी उपस्थित होते.
ही परीक्षा कैडेट्ससाठी शिस्त, नेतृत्व आणि सामरिक कौशल्ये विकसित करण्याची उत्तम संधी होती. परीक्षेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल सहभागी सर्व अधिकार्‍यांचे आणि कैडेट्सचे अभिनंदन करण्यात आले.

  Post Views:   36



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी