आज दहीहंडी निमित्य सोनाली कुलकर्णी ब्रम्हपुरीत !
गोकुळाष्टमी निमित्त दहीहंडीचा भव्य सोहळा
ब्रह्मपुरी
भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज झांशी राणी, चौक ब्रह्मपुरी येथे सांयकाळी ५ वाजता गोकुळाष्टानिमित्त भव्य दहीहंडीचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. प्रथम पुरस्कार १,५१,००० ₹ चा चिमुर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा. बंटीभाऊ भांगडीया यांच्या कडून तर द्वितीय पुरस्कार १, २१,००० ₹ ब्रह्मपुरी विधानसभेचे लोकप्रिय माजी आमदार प्रा. अतुलभाऊ देशकर व माजी बांधकाम सभापती नगर परिषद ब्रह्मपुरी विलासभाऊ विखार यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणार आहे. या दहीहंडीला विशेष आकर्षण म्हणून प्रसिद्ध सिने. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तसेच प्रसिद्ध गायिका इराशत जहाॅ उपस्थित राहणार आहे. तरी या दहीहंडीला ब्रह्मपुरी शहरातील व तालुक्यातील बंधू-भगिनीनी गोकुळाष्टानिमित्त दहीहंडीला मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवुन आनंद घ्यावा, असे आवाहन भाजपाचे शहराध्यक्ष प्राचार्य सुयोग बाळबुधे यांनी केले आहे.