एस.एस.सी.परिक्षेत ख्रिस्तानंद स्कूलची आदिती वालदे तालुक्यात प्रथम

ब्रम्हपुरी तालुक्याचा निकाल ८७.३७ टक्के
   

ब्रम्हपुरी/ का. प्र.
 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी परिक्षेचा निकाल राज्यमंडळाने मंगळवारला दुपारी ०१ वाजता ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावर जाहीर केला. यात ब्रम्हपुरी तालुक्यातून ख्रिस्तानंद स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज ब्रम्हपुरी येथील विद्यार्थीनी आदिती क्रिष्णा वालदे हिने ९६ टक्के गुण संपादित करून तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच सार्थक विवेक खडतकर, आर्यन अशोक नवघडे, हेमांशी राजेश दोनाडकर ह्या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे ९५ टक्के गुण प्राप्त करून द्वितीय तर नामश्री रविंद्र ठाकूर व डॉ.आंबेडकर विद्यालय ब्रम्हपुरी येथील विद्यार्थी निलेश मिलींद बोरकर यांनी अनुक्रमे ९४.८० टक्के गुण प्राप्त करून तृतीय स्थान मिळविले. ख्रिस्तानंद स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज ब्रम्हपुराचा विद्यार्थी शौर्य विलास बागडे ९४.४० टक्के गुण प्राप्त करीत तालुक्यातून चतुर्थ व नेवजाबाई हितकारिणी विद्यालय ब्रम्हपुरीचा विद्यार्थी हर्षल होमराज पगाडे याने ९४.२० टक्के गुण संपादित करीत पाचवे स्थान प्राप्त केले. विद्यार्थ्यांच्या सर्वोत्तम गुण प्राप्तीमुळे नेवजाबाई भैय्या हितकारिणी शिक्षण संस्थेचे सचिव अशोक भैय्या, प्राचार्य डॉ. देवेश कांबळे, मुख्याध्यापिका सिस्टर पावना, मुख्याध्यापिका प्रभा बनपूरकर, मुख्याध्यापक कपूर नाईक यांनी अभिनंदन केले.
 ब्रम्हपुरी तालुक्यातील २४०० विद्यार्थ्यांपैकी २३८४ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी २०८३ विद्यार्थी इयत्ता १० वी ची परीक्षा उत्तीर्ण झाले असून यात प्राविण्य श्रेणीमध्ये ३२८ विद्यार्थी, प्रथम श्रेणीमध्ये ५९७ तर द्वितीय श्रेणीमध्ये ७९२ व पास श्रेणीमध्ये ३६६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ब्रम्हपुरी तालुक्याचा इयत्ता १० वी चा निकाल ८७.३७ टक्के इतका लागला आहे. ब्रम्हपुरी तालुक्यातून ख्रिस्तानंद ज्यु. कॉलेज ब्रम्हपुरी, वैनगंगा विद्यालय कोलारी, श्री कॉन्हेंट, मदर पेट स्कूल अ‍ॅण्ड किड्स प्ले होमचा निकाल १०० टक्के लागला आहे.

  Post Views:   1558



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी