राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यस्मरण सोहळा

   


ब्रम्हपुरी/का.प्र.
तालुक्यातील खंडाळा येथील जि.प. प्राथमिक शाळेच्या पटांगणावर खंडाळा ग्रामवासियांच्या उपस्थितीत वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यस्मरणाचा कार्यक्रम नुकताच पार पडला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व मार्गदर्शक म्हणुन अड्याळ टेकडी येथील सुबोधदादा तसेच प्रमुख अतिथी म्हणुन डॉ. रामेश्वर राखडे, नवलाजी मुळे, पत्रकार लेकराम डेंगे, श्रीराम वाघधरे महाराज, माणिक राखडे, भाष्कर वाघधरे महाराज यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या निमित्याने खंडाळा गावामधिल गुरुदेव भक्तांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची विविध भजने सादर केली. सायंकाळी सामुदायिक प्रार्थना घेवुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष व मार्गदर्शक सुबोधदादा यांनी सामुदायिक प्रार्थनेचे महत्व समजावुन सांगितले व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. 
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन आयोजक, कवी, लेखक पांडुरंग डेंगे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मंगेश तलमले, बंडु डेंगे, रवी हरडे, दिलिप शेंडे यांनी परीश्रम घेतले.

  Post Views:   107



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी