यशाची परंपरा कायम! एल.एम.बी. पब्लिक स्कूलचा सीबीएसई परीक्षेत ऐतिहासिक निकाल; ११ विद्यार्थ्यांना आयटीत १०० पैकी १०० गुण
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी):
शिक्षणाचा दर्जा उंचावत यशाची नवनवीन शिखरे सर करणाऱ्या एन. एच. एज्युकेशन सोसायटी संचलित एल. एम. बी. पब्लिक स्कूल, ब्रह्मपुरी या शाळेने दरवर्षीप्रमाणे यंदाही सीबीएसई १० वी बोर्ड परीक्षेत आपला दबदबा कायम राखला आहे. शाळेचा निकाल केवळ १०० टक्केच लागला नाही, तर तब्बल ३६ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून शाळेच्या यशात मानाचा तुरा रोवला आहे.
यंदाच्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये शंतनु निलेश राऊत याने ९७.४% गुण मिळवून शाळेतून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. तर द्वितीय क्रमांक: सोहम सागर आखाडे (९७.२%), तृतीय क्रमांक: सम्यक मनोरंजन धोंगडे (९७%), चतुर्थ क्रमांक: शौर्य मिलिंद कुरसुंगे (९६.८%), पाचवा क्रमांक: सक्षम चंद्रशेखर वसाके (९६.६%) यांनी प्राप्त केला आहे. यावर्षी शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध विषयांत पैकीच्या पैकी गुण मिळवून इतिहास रचला आहे. मराठी विषयात सम्यक धोंगडे, समृद्धी ठाकरे, वल्लभ हर्षे आणि सात्विकी राऊत या चार विद्यार्थ्यांनी मराठी विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले. तसेच आयटी (IT): माहिती तंत्रज्ञान विषयात तब्बल ११ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. यामध्ये शंतनु राऊत, सोहम आखाडे, सक्षम वसाके, सार्थ लेनगुरे, उत्कर्ष नाकाडे, मैथिली चौधरी, पुर्वा हेमके, अयान वडसरिया, पियुश चहांदे, स्नेहित भानारकर आणि रूचा ढोक या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांच्या या घवघवीत या यशाबद्दल नेवजाबाई भैय्या हितकारिणी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष स्नेहलताताई भैय्या, सचिव अशोक भैय्या, सदस्य गौरव भैय्या, स्कूल चे संचालिका अशिता भैय्या, प्राचार्य कादिर कुरेशी यांनी सर्व गुणवंतांचे अभिनंदन केले असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. शाळेच्या संचालिका अशिताता भैया मॅम यांनीही "पुढेही असेच यश संपादन करत राहा," अशी आशा व्यक्त केली.
उपप्राचार्य राठी मॅम, पर्यवेक्षिका झोडे मॅम आणि संपूर्ण शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे तोंडभरून कौतुक केले आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेतील शिक्षक आणि पालकांच्या मार्गदर्शनाला दिले आहे. या दणदणीत विजयामुळे संपूर्ण ब्रह्मपुरी परिसरात आणि शाळेत आनंदाचे व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.