ब्रम्हपुरी/का.प्र.
राजकीय पक्षांना व जनतेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले होते. अनेक नगरपालिका, नगर परिषदा, नगरपंचायतींच्या निवडणुका रखडल्या होत्या. अनेक पालिकांचं कामकाज हे प्रशासकीय अधिकार्यांकडे सोपवण्यात आलं होत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार हा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात होता. अशातच जानेवारी २०२६ पूर्वी या निवडणुका घ्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले.
दरम्यान, या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ब्रम्हपुरी नगरपरिषद नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली. ब्रम्हपुरीचे नगराध्यक्ष पद ओबीसी प्रवर्गाकरीता आरक्षित करण्यात आले आहे. तसेच जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या आदेशाप्रमाणे ब्रम्हपुरी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ चे प्रभाग निहाय आरक्षणाची सोडत ०८ ऑक्टोंबरला दुपारी १२ वाजता काढण्यात आली. यामध्ये एकुण ११ प्रभागाकरीता २३ नगरसेवक निवडूण द्यायचे आहेत. तर नगराध्यक्ष हा जनतेतून निवडून द्यावयाचा आहे.
ब्रम्हपुरी नगर परिषदेकरीता एकुण २३ नगरसेवकांपैकी १२ पदे महिलांकरीता आरक्षित आहेत. सर्वसाधारण गट - सर्वसाधारण ०६ व महिला ०५ असे एकुण ११, नामप्र(ओबीसी) प्रवर्गातून - सर्वसाधारण ०३ व महिला ०३ एकुण ०६, अनुसुचित जाती प्रवर्गातून- सर्वसाधारण ०२ व महिला ०३ एकुण ०५ तसेच अनुसूचित जमाती मधून ०१ महिला असे एकुण २३ नगरसेवकांना निवडून द्यावयाचे आहे.
प्रभागनिहाय आरक्षण खालील प्रमाणे घोषित करण्यात आले आहे.
प्रभाग क्रमांक ०१- ना.म.प्र.(महिला), सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ०२ - अनु. जमाती (महिला), सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ०३ - ना.म.प्र., सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्रमांक ०४- अनु. जाती (सर्वसाधारण),सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्रमांक ०५- अनु. जाती (सर्वसाधारण), सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्रमांक ०६- अनु. जाती (महिला), सर्वसाधारण , प्रभाग क्रमांक ०७- अनु. जाती (महिला), सर्वसाधारण , प्रभाग क्रमांक ०८- अनु. जाती (महिला), सर्वसाधारण , प्रभाग क्रमांक ०९- ना.मा.प्र., सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्रमांक १०- ना.मा.प्र., सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्रमांक ११- ना.मा.प्र. (महिला), ना.मा.प्र. (महिला), सर्वसाधारण
ब्रम्हपुरी नगर पालिका नगरसेवक पदाचे आरक्षण सोडत पिठासन अधिकारी पर्वनी पाटील यांच्या उपस्थितीत ब्रम्हपुरी नगर परिषदेच्या सभागृहात पार पडली. यावेळी ब्रम्हपुरी नगर पालिकेच्या प्र. मुख्याधिकारी सोनम देशमुख यांच्यासह ईश्वर बिचेवार, मंगेश बोंद्रे, शरद नन्नावरे, अविनाश बंडावार यांच्यासह राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व पत्रकार बहुसंख्येने उपस्थित होते.