एलएमबी पब्लिक स्कुलमध्ये Graduation Day उत्साहात संपन्न

   


ब्रम्हपुरी/का.प्र.
येथील एल.एम.बी. पब्लिक स्कुलमध्ये पदवी प्रदान Graduation Day कार्यक्रम मोठया उत्साहात पार पडला. या वेळी सिनिअर केजीच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. 
कार्यक्रमाला प्रमुख अतिथींमध्ये नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्थेचे सचिव अशोकजी भैया सर, स्कुलच्या संचालिका आशिता भैया मॅडम, मुख्याध्यापक कादिर कुरेशी सर, उपमुख्याध्यापिका, पर्यवेक्षिका मॅडम उपस्थित होत्या. प्रसंगी सर्व विद्यार्थी पदवी स्विकारण्यासाठी निळ्या लाल रंगाचा कोट व टोपी परिधान करून आले होते. दरम्यान, सिनिअर केजीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी संगीत व नृत्य सादर केले. यावेळी सिनिअर केजीच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, प्रगती पुस्तक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. सिनिअर केजीतील नैनसी ढवळे हिने नर्सरी ते सिनिअर केजीचा प्रवासाची माहिती दिली. नैनसी ढवळे हिने खूप उत्कृष्ट भाषण दिल्याबद्दल शाळेचे अध्यक्ष  अशोकजी भैया सरांनी तिचे पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले. प्रसंगी अशोकजी भैया सरांनी केजीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन Graduation Ceremony पार पडली. सर्व LMBPS च्या शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला.

  Post Views:   105



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी