विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपीस ०१ वर्षाचा कारावास
ब्रम्हपुरी/का.प्र.
गावातील महिलेचा हात पकडून विनयभंग केल्याप्रकरणी ब्रम्हपुरी प्रथम श्रेणी न्यायालयाने निकाल देत आरोपीस ०१ वर्ष ०१ महिन्याचा कारावास व एक हजार पाचशे रूपये दंडाची सजा सुनावली आहे.
प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी महिला ही नाटकातील डॉन्स कार्यक्रम पाहून, स्वत:च्या घरी पाणी नेण्यासाठी आली असता, ब्रम्हपुरी तालुक्यातील मुई गावातील आरोपी रूपेश सोमेश्वर चौधरी वय २२ वर्षे याने २५ नोव्हेंबर २०१६ मध्ये रात्रो १०.४५ वाजता फिर्यादी महिलेचा हात पकडून ओढून विनयभंग केला.
फिर्यादी महिलेच्या रिपोर्ट वरून ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ३५४, ४४८ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली. सदर विनयभंग प्रकरणाचा निकाल ०६ डिसेंबर २०२५ रोजी डी.बी.गुट्टे प्रथम श्रेणी न्यायाधिश यांनी दिला. यात आरोपीस ०१ वर्ष ०१ महिन्याचा कारावास व एक हजार पाचशे रूपये दंडाची सजा सुनावली आहे. फिर्यादीच्या बाजूने एस.एल.वाघमारे, एस.डी.हटकर हे होते. तर आरोपीच्या बाजूने राजेश डांगे यांनी युक्तीवाद केला. तपासी अधिकारी म्हणून पोहवा अरून पिसे यांनी काम पाहिले.