नागभीड येथे विज्ञान संस्कार शिबीराचा समारोप
नागभीड/प्रतिनिधी
समिधा सेवा संस्था द्वारा संचालित श्रीमती रामप्यारीदेवी आसारामजी काबरा ट्विंकल इंग्लिश स्कूल नागभीड येथे सुरू असलेल्या विज्ञान संस्कार शिबिराचे समारोप कार्यक्रम दि. ४ मे २०२५ रोजी झाला. समारोपिय कार्यक्रमास बिंटेलिजेंडचे संस्थापक प्रा. संकेत जोशी, वि.भा.च्या कोर मेम्बर अनुजा मैत्रे, रमेशकुमार ढोके, कर्मवीर विद्यालयच्या प्रा. प्रतिभा कायरकर, समिधा सेवा संस्थेचे अध्यक्ष गणेश तर्वेकर, सचिव अजय काबरा, प्राचार्या शुभांगी पोहेकर, मुख्याध्यापिका संगीता नारनवरे उपस्थित होत्या.
सदर शिबिरात ७ दिवस विद्यार्थ्यांना विज्ञान विषयातील २५ विविध प्रात्यक्षिके करून प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्यात आले. २७ एप्रिल पासून स्थानिक ट्विंकल इंग्लिश स्कूल येथे सुरू असलेल्या या शिबिराचे उद्घाटन प्राचार्य डॉ. अमीर धम्माणी यांच्या शुभहस्ते पार पडले. या शिबिरात तालुक्यातील कर्मवीर विद्यालय, जनता कन्या, जनता बॉईज , सरस्वती ज्ञान मंदिर, ट्विंकल इंग्लिश स्कूल सह अनेक शाळेतील ७ वी ते ९वीच्या विद्यार्थांचा सहभाग होता.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन शिक्षिका कु. रुचिता पेटकर व शिक्षिका कु. फरीन शेख यांनी केले तर आभार प्रदर्शन शिबिर संयोजक शिक्षक दिपक कावडकर, शिक्षक राजीव खिब्रागडे यांनी केले. यावेळी विज्ञान भारतीच्या सर्व उपस्थित पदाधिकार्यांचा ट्विंकल इंग्लिश स्कुलच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला .