आम. वडेट्टीवारांच्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ फुंकला पुतळा
छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपची निदर्शने
ब्रह्मपुरी/का.प्र.
२२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप लोकांचा जीव गेला होता. दहशतवाद्यांनी धर्माबाबत विचारून ओळख पटवून पर्यटकांची हत्या केली. मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांनी केलेल्या दाव्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केला. दहशतवादी हल्ला करतेवेळी लोकांशी बोलत बसतात का? धर्म विचारत बसतात का? असा सवाल वडेट्टीवारांनी केला. काँग्रेसचे नेते आमदार विजय वडेट्टीवारांनी हिंदूंच्या जखमेंवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. नीच वक्तव्य करून दहशतवाद्यांना पाठीशी घालण्याचा केविलवाणा प्रयत्न काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांच्याकडून केला जात आहे.
या विधानाच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी ब्रह्मपुरीच्या वतीने माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या निषेधार्थ फरकड आंदोलन करण्यात आले. ब्रम्हपुरी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करत आंदोलन केले. या वेळी आमदार वडेट्टीवार यांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला. वारंवार काँग्रेसचे नेते आमदार विजय वडेट्टीवार पाकिस्तानी दहशतवाद्यांना पाठीशी घालण्याचे काम करत आहेत. २६/११ च्या मुंबई हल्ल्याबाबत त्यांनी वाचाळ वक्तव्य केले होते. आता पुन्हा एकदा आमदार वडेट्टीवार यांनी पहेलगाम येथे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांचा अपमान केला आहे. या प्रकरणी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाले होते.
या आंदोलनाप्रसंगी भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश पदाधिकारी प्रा. प्रकाश बगमारे, भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा सौ. वंदना शेंडे, भाजपा शहर अध्यक्ष अरविंद नंदूरकर, तालुका अध्यक्ष प्राचार्य अरुण शेंडे, माजी नगरसेवक तथा तालुका महामंत्री मनोज वठे, जिल्हा सचिव साकेत भानारकर, शहर महामंत्री मनोज भूपाल, महामंत्री ज्ञानेश्वर दिवटे, भाजयुमो जिल्हा सरचिटणीस तनय देशकर, भाजयुमो शहर अध्यक्ष प्रा. सुयोग बाळबुधे, तालुका अध्यक्ष अविनाश मस्के, न.प चे माजी बांधकाम सभापती विलास विखार, भाजपा महिला मोर्चा शहर अध्यक्षा सौ. वर्षा चौधरी, गोपाल कावळे, पवन जयस्वाल, स्वप्नील अलगदेवे, दत्ता येरावार, प्रमोद ढाल, माजी जि. प सदस्य शंकरदादा सातपुते, ओबीसी मोर्चा शहर अध्यक्ष प्रा. अशोक सलोटकर, महामंत्री राजू भागवत, महामंत्री प्रा. दिलीप जुमडे, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा सौ. मंजिरी राजणकर, प्रकाश लोखंडे, विनायक दुपारे, माजी उपसभापती नामदेव लांजेवार, सुरेश दर्वे, प्रा. संजय लांबे, ललित उरकुडे, विपुल मेश्राम, किशोर बावनकुळे, अनिल गराडे, राजू चौधरी, सौ. कुंभारे, सौ. झोडे, सौ. विभा सुभेदार, सौ. गीता जांभुळे, सौ. जोशी यांच्या सह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.