मंथन सामान्य ज्ञान स्पर्धेत ओमखेत प्रथम

   


ब्रम्हपुरी/का.प्र.
 जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, जुगनाळा येथील इयत्ता पाचवी मध्ये शिकणारा विद्यार्थी ओमखेत शालिकराम मैंद याने राज्यस्तरीय मंथन सामान्य ज्ञान स्पर्धेत केंद्रातून प्रथम क्रमांक, विभागातून चौदावा क्रमांक तर राज्यातून २५ वा क्रमांक पटकाविला. 
 त्याच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक गजानन प्रधान, वर्ग शिक्षिका प्रभा गणवीर, संगीता वैद्य, गोवर्धन टिकले, योगराज बोरकुटे, धनपाल दमके, गोपाल राऊत, स्वाती लाडेकर तथा स्वाती नाकाडे आदी शिक्षक वृंदांनी त्याचे अभिनंदन केले. त्याने आपल्या यशाचे श्रेय आपले आई वडील तसेच गुरुजनांना दिले.

  Post Views:   38



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी