ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचा दणदणीत विजय

   


ब्रह्मपुरी/का.प्र.
ब्रह्मपुरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था व्यवस्थापन समितीच्या निवडणूकीत बहुजन विकास आघाडी पॅनलने एकतर्फी विजय मिळवत सत्ता हस्तगत केली आहे. या निवडणुकीत एकूण ११ जागांपैकी बहुजन विकास आघाडीने १० जागांवर दणदणीत विजय मिळवत समोरील पॅनलचा धुव्वा उडवला. 
ही निवडणूक अनिल दोनाडकर यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आली होती. या निवडणुकीत ७०० मतदारांपैकी ५१७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. बहुजन विकास आघाडीने अंगठी या चिन्हावर निवडणूक लढवत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. विशेषतः ग्रामीण भागातील मतदारांनी या पॅनलला मोठ्या प्रमाणावर पसंती दर्शवली. 
या निवडणुकीत बहुजन विकास आघाडी पॅनलचे सर्वसाधारण गटातून अनिल दोनाडकर, डाकराम दोनाडकर, डॉ. पारेश्वर सेलोकर, अशोक ठेंगरी, अरविंद आंबोरकर, उषा तलमले, सुरेखा बालपांडे, इतर मागास प्रवर्ग गटातून नानाजी तुपट, अनुसूचित जाती जमाती गटातून अल्का ढवळे, विमुक्त जाती व भटक्या जमाती गटातून सुखदेव सोनटक्के विजयी ठरले.

  Post Views:   28



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी